Narendra Modi, Uddhav Thackeray and Sonia Gandhi (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी भेट झालीच नव्हती. त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर आज दुस-यांदा उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौ-यावर जाणार आहेत. येथे ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची देखील भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील.

महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे आज प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोनिया गांधींना भेटतील. आज संध्याकाळी 6 वाजता ते सोनिया गांधींची भेट घेतील.

ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली मध्ये भेट घेण्याची शक्यता

या दोन्ही भेटी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. महायुती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदींसह सविस्तर भेट आणि महाविकासआघाडी स्थापन केल्यानंतर होणारी सोनिया गांधींशी भेट या दोन्हीही गोष्टी उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाच्या असणार आहेत.

गेल्या काही दिवासांपासून महाआडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधान आलं होतं. त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेसचे प्रमुख आमदार सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे सोनिया गांधीना भेटण्यासाठी जाणार असल्यामुळे आघीडीत खरंच बिघाडी झाली का? याबाबत चर्चा सुरू आहे.

तर मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी शुक्रवारी दुसऱ्यांदा भेट होणार आहे. याआधी पंतप्रधान महाराष्ट्रात आले असताना ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती.