भारतीय कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विराट कोहली आता त्याच्या वन8 कम्युन (One8 Commune) या रेस्टॉरंट चेनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका ग्रुपने दावा केला आहे की, या हॉटेलमध्ये समलैंगिकांना (LGBTQIA+) परवानगी दिली जात नाही. याबाबत सोशल मीडियावर बराच वाद सुरु झाला असून, त्यानंतर रेस्टॉरंटने स्पष्टीकरण जारी केले आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे ज्यात आरोप आहे की विराट कोहलीच्या पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे सुरू असलेल्या वन8 कम्युन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये समलैंगिकांना प्रवेश दिला जात नाही.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘विराटच्या हॉटेलमध्ये समलैंगिक पुरुषांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी आहे. तसेच ट्रान्सजेन्डर महिलांना त्यांच्या ड्रेसच्या आधारे प्रवेश दिला जातो. भारतातील फॅन्सी रेस्टॉरंट, बार आणि क्लबमध्ये LGBTQ विरुद्ध भेदभाव सामान्य आहे आणि विराट कोहलीही तेच करत आहे.’ या पोस्टवरून सोशल मीडियावर बराच वाद झाला व विराट कोहलीवर गंभीर आरोप केले जाऊ लागले. काही लोकांनी या पोस्टला फेक असेही म्हटले. मात्र, या आरोपांना वन8 कम्युनच्या इंस्टाग्रामवर स्पष्टीकरण दिले आहे.
Captain @imVkohli has a chain of Resturants and guess what the LGBTQIA+ people are not welcomed.
Queerphobic. pic.twitter.com/st44L0ZMLg
— Ritushree 🌈 (@QueerNaari) November 15, 2021
One8 Commune ने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 'आम्ही कोणताही भेदभाव न करता सर्व लोकांचे त्यांच्या जेन्डरसह स्वागत करतो आणि त्यांचा आदर करतो. आम्ही सर्व समाजाच्या सेवेत नेहमीच पुढे आहोत. इंडस्ट्री ट्रेंड आणि सरकारी नियमांनुसार, आमच्याकडे स्टॅग एंट्रीवर बंदी आहे. याचा अर्थ आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात आहोत किंवा कोणाचाही अपमान करत आहोत असा होत नाही.’
View this post on Instagram
(हेही वाचा: घड्याळांची किंमत 5 नव्हे तर 1.5 कोटी रुपये, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या हार्दिक पांड्याने दिले स्पष्टीकरण)
पुढे म्हटले आहे, ‘जर अनावधानाने एखादी घटना किंवा काही चुकीचा संवाद घडला असेल, तर त्या व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधावा अशी आमची इच्छा आहे जेणेकरून हा वाद योग्य प्रकारे मिटवला जाऊ शकेल. आमचे ग्राहक आमचे प्राधान्य आहेत, त्यांच्याशी मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे नातेसंबंध निर्माण करणे हा आमच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे.’