Supreme Court

सर्वोच्च न्यायालाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice D Y Chandrachud) यांनी मणीपूर प्रकरणावरुन व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एका वकिलाला जोरदार झापले. मणीपूरमध्ये घडलेल्या महिलांच्या अत्याचारावरील व्हिडिओबाबत बोलताना सुनावणीदरम्यान वकिलाने सांगितले की, देशभरामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत. ज्या महिलांच्या विरोधात आहेत. या वेळी कोर्टाने वकिलाला झापत म्हटले की, इथे Whataboutery चालणार नाही. देशभरातही असेच गुन्हे घडत आहेत म्हणून आम्ही मणिपूरच्या घटनेकडे दुर्लक्ष करु शकत नाही, एएन आय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. मणिपूरमध्ये 4 मे रोजी दोन कुकी महिलांना मैतेई समूहाच्या पुरुषांच्या एका गटाने नग्न केले होते. त्यांची धिंड काढून त्यांच्या शरीराला अत्यंत विकृतपणे स्पर्ष केला होता.

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आज म्हटले की, मणिपूरमध्ये जे घडले तसेच इतरत्र घडले असे सांगून आम्ही त्याचे समर्थन करू शकत नाही. बंगाल, राजस्थान आणि छत्तीसगढमधील महिलांवरील गुन्ह्यांबद्दल बोलणाऱ्या वकिलाला उत्तर देताना, दोन महिलांना नग्न अवस्थेत परेड केल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना, मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, जातीय आणि सांप्रदायिक कलहाच्या परिस्थितीत हिंसा घडल्याच्या घटनेत आम्ही अभूतपूर्व स्वरूपाच्या गोष्टी हाताळत आहोत.

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टाने केंद्र सरकारलाही काही प्रश्न विचारले. कोर्टाने केंद्राला विचारले की, मणीपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराची किती प्रकरणे नोंदवली गेली? यावर केंद्राने सांगितले की, सरकारकडे या क्षणी निश्चित असा वर्गिकृ डेटा उपलब्ध नाही. मणिपूरमधील पीडित महिलांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी असे म्हटले.

ट्विट

दरम्यान, कोर्टाने केंद्राला सहा मुद्द्यांचे स्पष्टीकरण घेऊन पुन्हा येण्यास सांगितले, यात प्रकरणांचे विभाजन, किती शून्य एफआयआर,किती जणांची कार्यक्षेत्र पोलीस ठाण्यात बदली झाली,आतापर्यंत किती जणांना अटक केली, अटक आरोपींना कायदेशीर मदतीची स्थिती,कलम 164 मध्ये आतापर्यंत किती जबाब नोंदवले आहेत, आदी मुद्द्यांचा समावेश आहे.