Chitrakoot Accident: चित्रकूटमध्ये डंपरची ऑटो रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर
Accident (PC - File Photo)

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये (Chitrakoot) भरधाव वेगाने जाणारा डंपर आणि ऑटो यांची जोरदार धडक झाली. या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले (Road Accident) आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना प्रयागराज (Prayagraj) येथे हलवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.  अपघातानंतर आठ जणांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला.  (हेही वाचा - Sangli Road Accident: सांगलीत भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 4 मजुरांचा मृत्यू)

चित्रकूट कोतवाली परिसरात झाशी-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमनपूरजवळ  ऑटोमध्ये चालकासह एकूण आठ जण असल्याची माहिती मिळत आहे. या मृतांमधील तीन मृतदेहांची ओळख पटलेली आहे. यातील दोन मृत व्यक्ती कन्नौजचे रहिवासी आहेत आणि एक हमीरपूरचा रहिवासी आहे. पोलीस इतर दोघांची ओळख पटवत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पहाटे झालेल्या या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. ऑटोमधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ऑटोमध्ये अडकलेल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं होतं.

पोलिसांनी अपघाताची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली. याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीय चित्रकूटला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून हा ट्राफिक जाम मोकळा केला आहे.