Sangli Road Accident: सांगलीत भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 4 मजुरांचा मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात रस्ते अपघातांचे (Road Accident) सत्र सुरुच आहे. सांगलीतही भीषण अपघाताची (Sangli Accident) घटना घडली. सांगलीत आज सकाळी अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार उसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  (हेही वाचा - Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून घरी जात असताना काळाचा घाला, भावी नवरदेवासह बहिण आणि भाचीचा जागीच मृत्यू)

सांगली-सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकचा सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला. या घटनेतील जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामधील मृतांमध्ये दोन महिला , एका मुलगा आणि लहान मुलीचा समावेश आहे.

सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर सोमवारी मध्यरात्री जात होता. या ट्रॅक्टरमध्ये 10 हून अधिक ऊसतोड कामगार आणि त्यांची मुले होती. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार येथील ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळत आहे. ते काम आटोपून परतत असताना सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 4 मुजरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर जखमी झाले. या जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.