Chandrayaan 3 Update:  विक्रम लॅन्डर उतरलं ते ठिकाण 'शिवशक्ती' तर चंद्रयान 2 पोहचलेल्या ठिकाणाचं नाव 'तिरंगा' - PM Modi यांची घोषणा
PM Modi | Twitter

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत नवा विक्रम रचला आहे. दरम्यान इस्त्रोच्या (ISRO) या कामगिरीचं कौतुक आज (26 ऑगस्ट) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बेंगळूरू मध्ये त्यांची थेट भेट घेत केली आहे. 23 ऑगस्ट दिवशी चंद्रयान 3 (Chandrayaan 3) चंद्रावर लॅन्ड झालं आहे त्यावेळी ब्रिक्स समिट साठी मोदी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. परदेश दौरा आटपत त्यांनी आज सकाळी थेट इस्त्रो शास्त्रज्ञांची मुख्यालयामध्ये भेट घेतली आहे. भारताच्या कामगिरीचं कौतुक करताना त्यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या घोषणांमध्ये 23 ऑगस्ट हा दिवशी चंद्रयानाच्या यशस्वी सॉफ्ट लॅन्डिंगच्या निमित्ताने ' राष्ट्रीय अवकाश दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच चंद्रयान 3 जेथे उतरलं त्या विक्रम लॅन्डरच्या जागेचं नाव 'शिवशक्ती' करण्यात आलं आहे. तर चांद्रयान-2 ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या ठिकाणाचं नामकरण 'तिरंगा' करण्यात आल्याची घोषणा मोदी यांनी केली आहे.

'हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते.' असेही पंतप्रधान म्हणाले. तर शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचं सांगत विक्रम लॅन्डरच्या लॅन्डिंग पॉईंटला 'शिवशक्ती' संबोधलं जाणार आहे. स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँईंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. त्यानुसार ही नावं देण्यात आली आहेत.

पंतप्रधानांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करताना त्यांना देशाचे रोल मॉडेल म्हणून संबोधलं आहे. चंद्रयान 3 चा विक्रम लॅन्डर जेव्हा चंद्राच्या ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅन्डिंग करत उतरला तो क्षण अजरामर झाल्याचं मोदी म्हणाले आहेत. त्यावेळी इस्त्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला. असं म्हणत त्यांनी इस्त्रो च्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.