Chandrayaan3 launched into orbit. (Photo Credits: twitter/@chandrayaan_3)

14 जुलै दिवशी अवकाशामध्ये झेपावलेलं चंद्रयान 3 (Chandrayaan 3) आज चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग (Soft Landing) करण्याच्या तयारीमध्ये आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर विक्रम लॅन्डर (Vikram Lander) उतरवण्याचा इस्त्रो (ISRO) चा प्रयत्न आहे. दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे विक्रम लॅन्डर उतरल्यास ही कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव भागाची अद्याप कुणाकडेही माहिती नाही. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा ट्प्पा आणि ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्यामुळे इस्त्रोच्या वैज्ञानिकांसोबतच भारतीयांचे लक्ष देखील चंद्रयान 3 कडे असणार आहे.

2019 च्या चंद्रमोहिमेच्या वेळेस अगदी अंतिम टप्प्यामध्ये लॅन्डरशी संपर्क तुटला होता पण यंदा मागील चूका सुधारत ही मोहिम आखण्यात आली असल्याने लॅन्डर चंद्रावर यशस्वी उतरवण्यासाठी वैज्ञानिक कसोशीने प्रयत्न करणार आहेत. चंद्रयान 3 चं यशस्वी लॅन्डिंग व्हावी म्हणून आज देशा-परदेशातील भारतीय होमहवन, पूजा पाठ, प्रार्थना करत आहेत. Chandrayaan 3 Landing Date and Time: चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लॅडिंगची उत्सुकता; जाणून घ्या कधी, कुठे पहाल थेट प्रक्षेपण .

चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेसाठी प्रार्थना

अमेरिकेतही प्रार्थना

दुवा

दरम्यान चंद्रावर यापूर्वी अमेरिका, रशिया, चीन यांनी आपली यानं उतरवली आहे. भारत या यादीमधील चौथा देश असणार आहे. काही दिवसांपूर्वीचं रशियाचं लूना 25 चंद्रावर उतरण्यात अयशस्वी ठरलं होतं. त्यामुळे आता भारताच्या चंद्रयान 3 कडे सार्‍यांचे लक्ष असणार आहे. लॅन्डिंग पूर्वी 2 तास आधी वैज्ञानिक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सारं आलबेल असेल तर आज लॅन्डिंग होईल अन्यथा ते 27 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. जर स्थिती अनुकूल असेल तर आज संध्याकाळी 5.20 पासून या लॅन्डरचं सॉफ्ट लॅन्डिंग थेट पाहण्याची सुविधा इस्त्रो कडून करण्यात येणार आहे. इस्त्रो च्या अधिकृत वेबसाईट प्रमाणेच युट्युब चॅनेल, फेसबूक वर लाईव्ह पाहता येणार आहे.