(प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay

देशात सध्या अवैध पद्धतीने शस्र वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या प्रकारावर चाप बसण्यासाठी केंद्र सरकार एक नवा कायदा तयार करत आहे. या प्रकरणी अवैध शस्र बाळगणाऱ्या किंवा वापरणाऱ्या व्यक्तीला आजीवन कारावासाची शिक्षा दिली जाणार आहे. कॅबिनेट यांच्याकडे हे बिल पास करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या कायद्यानुसार अवैध शस्र बाळगणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शस्रांचे नुतीकरण करण्याचा अवधी तीन वर्ष वाढवून पाच वर्ष केली जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशात बहुतांश ठिकाणी खुल्या पणाने गोळी झाडल्याचे प्रकार समोर आले आहेत. या वर्षात सप्टेंबर महिन्यातच दिल्लीत 11 जणांवर गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे अशा प्रकारे शस्रांचा वापर दिल्लीत केला जात आहे. ऐवढेच नाही तर लहानश्या वादावरुन सुद्धा गोळ्या झाडल्याचा ट्रेन्ड दिसून येत आहे. याच सर्व प्रकारांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकार अवैध शस्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार आहे.(टूथपेस्ट समजून उंदराच्या विषाने दात घासल्याने एका महिलेचा मृत्यू)

अवैध शस्र बाळगाणाऱ्या व्यक्तीला आजीवन कारावास होणार आहेच. पण अधिनियमानुसार 5 आणि 10 वर्षांऐवजी ती आता 7 ते 14 वर्ष करण्यात येणार आहे. लग्न सोहळ्यात बेभानपणे गोळीबार केल्यास शिक्षेत वाढ होणार आहे, तर पोलिसांकडून शस्र काढून घेतल्यास 10 वर्ष आणि आजीवन कारावासाची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. त्याचसोबत सामान्य नागरिककडे शस्र वापरण्यावर बंदी आहे.