खुशखबर! 5 वर्षानंतर मिळणारी ग्रॅज्युटी आता वर्षभरातच मिळण्याची शक्यता; ही योजना लवकरच अमलात आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

केंद्र सरकार (Central Government) लवकरच नोकरदारवर्गासाठी एक खुशखबर घेऊन येणार आहे. मोदी सरकार ग्रॅज्युटीच्या नियमांत मोठा बदल करण्याची शक्यता आहे. या बदलानंतर 5 वर्षानंतर मिळणारी ग्रॅज्युटी 1 वर्षात मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सरकार संसदेत एक बिल घेऊन येण्याच्या तयारीत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. फायनान्सशियल एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने ग्रॅज्युटी देण्याचा हा कार्यकाळ कमी केल्याच्या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

फायनान्सशिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कोड ऑफ सोशल सिक्युरिटी 2019 वर एक ड्राफ्ट तयार केला आहे. या ड्राफ्टवर स्टेक होल्डर आणि जनतेचे मत विचारात घेण्यात येणार आहे. खुशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Government Job ची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी

ग्रॅज्युटीविषयी बोलायचे झाले तर, आता ग्रॅज्युटी त्याच लोकांना मिळते ज्यांना कंपनीत काम करुन कमीत कमी 5 वर्ष झाली असतील. 5 वर्षाच्या आत जर त्यांना नोकरी सोडली तर त्यांना ही ग्रॅज्युटी मिळत नाही. त्यामुळे सरकारने हा 5 वर्षांचा कार्यकाळ कमी करुन 1 वर्ष करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे नोकरदारवर्गाला त्यांची ग्रॅज्युटी वर्षभरात मिळू शकते.

ग्रॅज्युटीचा हा कार्यकाळ कमी झाल तर नोकरदारवर्गाला याचा नक्कीच फायदा होईल. तसेच आर्थिक दृष्ट्याही त्यांसाठी ही योजना हितावह आहे. ग्रॅज्युटीची रक्कम ही कर्मचारीचे मूळ वेतना आणि त्याची कंपनीतील सेवेचा कालावधी यावर अवलंबून असते.