खुशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Government Job ची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीची (Government Jobs) इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. एनएफआरने (NFR) भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे. त्यामुळे ही सरकारी नोकरी जर मिळवायची असेल तर लवकरच अर्ज करा कारण आता फक्त 20 दिवस उरले आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वेने विविध पदांवर रिक्त जागा अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2,590 पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदांची नावे-

मेकॅनिकल, पेंटर, मेकेनिस्ट, वेल्डर, फिटर, सुतार, इलेक्ट्रीशियन, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, लाईनमन, मेसन, फिटर स्ट्रक्चरल, मशिनिस्ट (ग्राइंडर), सिस्टम मेन्टेनन्स इन इन्फॉरमेशन एंड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सन 2019 साठी अप्रेंटिस ट्रेनिंग

वय मर्यादा-

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे.

शैक्षणिक पात्रता-

उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50 % गुणांसह दहावी किंवा त्या समकक्ष (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Government Job: ECIL मध्ये 200 रिक्त पदांसाठी नोकरभरती, अभियंता उमेदवारांनी 'या' पद्धतीने करा अर्ज)

अर्ज प्रक्रिया-

दिलेल्या कालावधीत पूर्ण भरून पाठवलेला अर्ज वैध मानला जाईल. अर्ज करण्यापूर्वी, कृपया दिलेल्या सर्व सूचना वाचा, सर्व माहितीविषयी जागरूक व्हा आणि 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.

निवड प्रक्रिया-

या नोकरीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.