केंद्रातील नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने बुधवारी शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय कॅबिनेटने वर्ष 2022-23 च्या सीजनसाठी रबी शेतीसाठी MSP मध्ये वाढ केली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने गहूच्या एमएसपी मध्ये 40 रुपयांनी वाढ केली आहे. जी आता 2015 रुपयांपर्यंत पोहचली आहे. तसेच बार्लीच्या एमएसपी मध्ये 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सरकारच्या मते मसूर, रेपसीड किंवा सरसो (400 रुपये प्रति क्विंटल) ची एमएसपीत गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक वृद्धी झाली आहे. यामुळे सर्व रबी शेतपिकांमच्या किंमतीत वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून गेल्या काही काळापासून विविध पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यात येत आहे. सरकारने दावा केला आहे की, शेतकऱ्यांच्या संबंधित जे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली जातील.(सामान्य माणसाला झटका! कपडे धुणे व अंघोळ करणे झाले महाग; HUL कडून Surf Excel, Rin, Lux, Lifebuoy च्या किंमतीमध्ये मोठी वाढ)
दरम्यान, शेतकऱ्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून तीन नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. विविध सीमेवर हे आंदोलन सुरु असून केंद्राने हे नवे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी केली जात आहे. अशातच आंदोलन आता पुन्हा तीव्र होऊ लागले आहे. बुधवारी केंद्रीय कॅबिनेटने रबी शेतपिकाच्या एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हरियाणातील करनाल येथे शेतकरी आणि स्थानिक प्रशासन एकमेकांसमोर आले आहेत. शेतकऱ्यांच्या संघटनेद्वारे येथे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या लाठीचार्जचा विरोध केला आहे.