मोदी सरकारची मोठी कारवाई, सिख फॉर जस्टिस संबंधित App, बेवसाइट आणि सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक
PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

केंद्र सरकारने 'सिख्स फॉर जस्टिस' या खलिस्तानी संघटनेवर मोठी कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'सिख्स फॉर जस्टिस'शी जोडलेली अॅप्स, वेबसाइट्स आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक केली आहेत. 'पंजाब पॉलिटिक्स टीव्ही'चे अॅप्स, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.(Lalu Prasad Yadav Fodder Scam: लालू प्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगवारी; राष्ट्रीय जनता दलाला धक्का, तेजस्वी यादव यांच्यासमोरील आव्हाने वाढली)

दरम्यान, आयबी मंत्रालयाचे म्हणणे आहे की परदेशी स्थित 'पंजाब पॉलिटिक्स टीव्ही'चे अॅप्स, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंट्सचा शिख फॉर जस्टिसशी जवळचा संबंध आहे.(Job in Income Tax Department: आयकर विभागात नोकरीसाठी बनावट नियुक्ती पत्रे जारी; डिपार्टमेंटने जनतेला केले सावध)

Tweet:

हे चॅनल पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ऑनलाइन मीडियाचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुप्तचर माहितीच्या आधारे सरकारला समजले. म्हणून, मंत्रालयाने, IT नियमांनुसार आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून, 18 फेब्रुवारी रोजी 'पंजाब पॉलिटिक्स टीव्ही'चे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता.