Calcutta HC Suggestion On Lioness Named Sita: 'सीता' सिंहिणीचे नाव बदला; कोलकाता हायकोर्टाचे पश्चिम बंगाल सरकारला तोंडी निर्देश
Lions | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) पश्चिम बंगाल राज्य सरकारला (West Bengal Govt) सिलीगुडीच्या सफारी पार्कमधील (Siliguri's Safari Park) सिंहिणीचे नाव (Rename Lioness 'Sita') बदलण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत. प्राण्यांची नावे आदरणीय व्यक्ती, महापुरुष अथवा देवी देवतांवरुन ठेऊ नयेत, असे न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हटले आहे. सफारी पार्कमध्ये असलेल्या सिंहाचे नाव 'अकबर' आणि सिंहीणीचे नाव 'सीता' असे ठेवण्यात आले होते. दरम्यान, या नावांमुळे आमच्या देवी-देवतांचा अपमान होतो. आमच्या भावना दुखावल्या जातात, असा दावा करत ही नावे बदलण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली होती. तसेच, त्याबातब कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. ज्यावर कोर्टाने सुनावणी घेतली.

एकल खंडपीठासमोर सुनावणी

विश्व हिंदू परिषदेने (विहींप) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी सरकारी पक्ष आणि याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी विविध मुद्दे मांडले. अखेर कोर्टाने तोंडी आदेश दिले, असे लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तात म्हले आहे. दरम्यान, न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी याचिकेवर काल सुनावणी करताना दुर्गादेवीच्या चरणी सिंहाचा संदर्भ दिला. एखाद्या प्राण्याला आपुलकीने नाव दिले जाऊ शकते, आपण दुर्गापूजेच्या वेळी सिंहांची पूजा करतो. हे त्या व्यक्तीच्या मानसिक प्रवृत्तीवर अवलंबून असते, आपण सिंहाशिवाय दुर्गेची कल्पना करू शकतो का, असा सवालही उपस्थित केला. (हेही वाचा, Lion Lioness Name Controversy: सिलीगुडी सफारी पार्कमध्ये सिंह 'अकबर', सिंहिण 'सीता', नावावरुन वाद; विहिंपची कोलकाता न्यायालयात धाव)

विहिंपकून नाव बदलण्याची मागणी

विश्व हिंदू परिषद (VHP) किंवा जागतिक हिंदू परिषदेने सिंहिणीचे नाव बदलण्याच्या आदेशाची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. सिंह आणि सिंहीणीचे अशा पद्धतीने नामकरण करणे म्हणजे हिंदू समुदयाच्या धार्मिक श्रद्धांवर आघात करण्याचा निंदनीय प्रकार असल्याचे म्हटले होते. याचिकाकर्त्यांनी असेही नमूद केले की आणखी एक पाच वर्षांचा सिंह उत्तर बंगाल वन्यजीव प्राणी उद्यानात आहे आणि त्याचे नाव अकबर आहे.  (हेही वाचा, सहा सिंहींणींसोबत एकटी चालतेय तरूणी; वायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क (Watch Viral Video) .)

विहींपने एका निवदेनात म्हटले आहे की, सिलीगुडी येथील सफारी पार्कमध्ये असलेल्या सिंह, सिंहीणीला दिलेल्या नावावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला या नावावर आक्षेप असल्याचे सांगणाऱ्या 'देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून' कॉल आणि तक्रारी आल्या आहेत. तक्रारकर्त्यांपैकी एक, VHP चे पश्चिम बंगाल सचिव लक्ष्मण बन्सल म्हणाले की, असे कृत्य ईश्वरनिंदा आहे आणि सर्व हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांवर थेट आक्रमण आहे. सीता आणि अकबर यांना एकत्र ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. दरम्यान, या वेगळ्या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. एखाद्या प्राण्याच्या नावावरुन राजकीय गदारोळ होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.