सहा सिंहींणींसोबत एकटी चालतेय तरूणी; वायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क (Watch Viral Video)
सिंहिणींसोबत तरूणी (Photo Credits: Instagram)

जंगली जानवरांसोबतचे अनेक रोमांचक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडीयामध्ये पाहिले असतील. जंगलातील प्राण्यांच्या विश्वातला नजारा पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत असेल. सिंह हा जंगलाचा राजा असतो. त्याच्यासमोर उभं राहण्याची जंगलातच्या इतर कोणत्या प्राण्याची हिंमत मुश्कीलीने होते अशामध्ये माणसाची त्याच्यासोबतची दोस्ती ही गोष्टच दुर्मिळ आहे. पण या जगात अशक्य असं काहीच नसतं. त्यामुळे अनेकांना अचंबित करणारा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे आणि तो पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या एका व्हिडीओ मध्ये तरूणी चक्क 1, 2 नव्हे तर सहा सिंहीणींसोबत फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य आणि प्रसंगी भीती वाटली असेल पण व्हिडिओतील तरूणी कोणत्याही भीतीशिवाय सिंहींणींसोबत फिरताना दिसत आहे. हे देखील नक्की वाचा: Viral Snake Video: सापासोबतची मस्ती अंगलट आली; बघता बघता तोंडात पकडले तरूणाचे केस! 

सिंहीणींसोबत फिरत असलेल्या तरूणीच्या व्हिडीओ ला safarigallery या इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहे. त्याला कॅप्शन देताना 'रोज असं एक काम करा ज्यामुळे तुम्ही जीवनातून भीतीला दूर करू शकाल. तुम्ही हे करू शकता का? ' असं लिहण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडीया युजर्स हैराण झाले आहेत. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये लिहल्या आहेत.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by SAFARI GALLERY 🦁 (@safarigallery)

व्हिडिओ सोबत दिलेल्या माहिती प्रमाणे सुरूवातील सिंह आफ्रिका, आशिया आणि युरोपात आढळत असतं पण आफ्रिकेत आता मोजकेच सिंह उरले आहेत. भारतात गीर नॅशनल पार्क मध्ये सिंह आहेत. सध्याच्या व्हिडिओ मध्ये सिंहीणी देखील या तरूणीला कोणतीही इजा न करता चालत असल्याचं पहायला मिळालं आहे.