केबल टीव्ही धारकांना दिलासा, आता 130 रुपयात पाहता येणार 150 चॅनल्स
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

केबल टीव्ही धारकांसाठी खुशखबर आहे. कारण डीटीएच धारकांना आता फक्त 130 रुपयात अधिक चॅनल्स पाहता येणार आहेत. नव्या टॅरिफ नियमांनुसार ग्राहकांकडून तक्रारी आल्या होत्या की, चॅनल्ससाठी जास्त पैसै घेतले जात आहेत. त्यामुळे ट्रायकडून ग्राहकांच्या या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आता ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनकडून ग्राहकांना या तक्रारीपासून दिलासा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ऑल इंडिया डिजिटल फेडरेशन यांनी सब्सक्रिप्शन कॉस्ट कमी करण्यासाठी काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. फेडरेशनने असे ठरवले आहे की, आता ग्राहकांना फक्त 130 रुपयांच्या NFC चार्जमध्ये 150 स्टॅंडर्ड डेफिनिशन (SD) चॅनल्स दिसणार आहेत. मात्र यापूर्वी फक्त 100 चॅनल्स दाखवले जात होते. फेडरेशनचे अध्यक्ष एस. एन. शर्मा यांनी असे म्हटले आहे की, याबाबत अन्य सदस्यांसोबत बातचीत करण्यात आली आहे. यामध्ये 130 रुपयांत 150 एसडी चॅनल्स आता दाखवले जात असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या केबल धारकांना यापूर्वी 100 चॅनल्स पहायचे होते त्यांच्याकडून प्रत्येक 25 चॅनल्ससाठी अतिरिक्त 20 रुपये द्यावे लागत होते. तसेच 150 चॅनल्स पहायचे असल्यास त्या धारकांनी जीएसटीसह 170 रुपये द्यावे लागत होते. फेडरेशनच्या द्वारे करण्यात आलेला हा बदल केबल टीवी सब्सक्राइबर्ससाठी लागून आहे. पण डीटीएच सब्सक्राइबर्सला या सुविधेचा लाभ घेण्याची संधी देण्यात आली नाही आहे.(ऑलनाईन पद्धतीने व्यवहार अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत ग्राहकाला दररोज मिळणार 100 रुपये; RBI कडून निर्देशन)

ट्रायने डीटीएच आणि केबल नेटवर्कसाठी नवा टेरिफची घोषणा केली होती. त्यानंतर केबल पॅकच्या शुल्कात वाढ करण्यात आली होती. मात्र आता टेरिफ नियमाच्या संदर्भात ट्रायने टीवी पाहण्यासाठी त्याचे शुल्क कमी करण्यात यावे यासाठी प्रयत्न केले पण अद्याप काही झालेले नाहीत.