ऑलनाईन पद्धतीने व्यवहार अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत ग्राहकाला दररोज मिळणार 100 रुपये; RBI कडून निर्देशन
RBI (File Photo)

सध्या डिजिटल पद्धतीला चालना मिळण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केले जात आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अन्यथा युजर्सची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र आता आरबीआय (RBI) कडून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याबाबत नवा निर्देशन दिले आहे. या निर्देशनानुसार ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना तो अयशस्वी झाल्याचे दाखवल्यास युजर्सला रिफंड मिळेपर्यंत दर दिवसाला 100 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरबीआयने ऑनलाईन पेमेंट बाबत एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना एका दिवसात रिफंड न मिळाल्यास तो पुन्हा मिळेपर्यंत प्रत्येकदिवसाला 100 रुपये ग्राहकाला दिले जातील असे म्हटले आहे. तर UPI, IMPS,NACH यांच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

तर 15 ऑक्टोंबर पासून आरबीआयने निश्चित वेळेत रिफंड न दिल्यास संबंधित युजर्सला 100 रुपयांप्रमाणे प्रत्येक दिवशी दंडाची रक्कम द्यावी लागणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या नियमानुसार ग्राहक त्याबद्दल आरबीआयकडे तक्रार सुद्धा करु शकणार आहेत. आरबीआयकडून ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास त्याच्या संबंधित टर्न अराउंट टाइम या नियमात काही बदल केले आहेत. यामुळे आता रिफंड मिळण्यासाठी युजर्सला जास्त दिवस वाट पहावी लागणार नाही आहे.(Paytm मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली 10 कोटी रुपयांचा घोटाळा; कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली फसवणूक)

तसेच रिफंड मिळण्याबाबत बँकांना युजर्सकडून तक्रार मिळाली नाही तरी सुद्धा त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र जर बँकेकडे युजर्सने तक्रार करुन ही पैसे न दिल्याचे प्रकार समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.