Bus falls into gorge (फोटो सौजन्य - PTI)

Jammu Bus Accident: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) च्या मांडा (Manda) येथे बस दरीत कोसळली (Bus Falls Into Gorge). या अपघातात (Accident) बसचा चालक ठार झाला तर 17 भाविक जखमी झाले. कटरा येथील माता वैष्णोदेवी (Vaishno Devi) मंदिरातून हे भाविक परतत होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमींमध्ये 7 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. X वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कटराहून दिल्लीला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या मांडा येथे झालेल्या बस अपघाताने खूप दुःख झाले आहे. या दुःखद घटनेत जीव गमावलेल्या चालकाच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना वैद्यकीय सेवा मिळत आहे. त्यांच्या लवकरात लवकर बरे व्हावे, अशी शुभेच्छा. बचाव पथके आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या जलद आणि प्रशंसनीय प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार. माझे कार्यालय संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Telangana Tunnel Collapse: तेलंगणात मोठी दुर्घटना! SLBC बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळला; 6 कामगार अडकल्याची भीती)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. X वरील पोस्टमध्ये, एलजी सिन्हा यांनी म्हटले आहे की, 'जम्मूमधील मांडा येथे झालेला रस्ता अपघात दुःखद आहे. या दुःखाच्या वेळी, माझे विचार प्राण गमावलेल्या चालकाच्या कुटुंबासोबत आहेत. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे होतील. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जखमी यात्रेकरूंना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.'