Uttar Pradesh: बलात्कारास विरोध, प्रियकराकडून प्रेयसीची हत्या; उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील घटना
Kill | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

बलात्कार (Rape) करताना विरोध केल्याच्या कारणावरुन तरुणीची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील लखनऊ (Lucknow) येथली सरोजनी नगर (Sarojini Nagar) परिसरात ही घटना घडली. पीडिता ही विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या प्रियकरानेच आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने हे कृत्य केले. प्रियकर (Boyfriend) आणि त्याच्या दोन मित्रांनी पीडितेवर बालात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पीडितेने विरोध दर्शवला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने मित्रांच्या सहाय्याने पीडितेवर चाकुहल्ला केला. पीडितेवर चाकुचे 24 वार करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात प्रियकर मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) याच्यासह दोन तरुणांना अटक केली आहे. मोहम्मद याच्यासोबत अटक केलेल्या तरुणांची नावे विशाल आणि आकाश असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद कैफ याने पीडितेला डेटसाठी बोलावले होते. त्याने पीडितेला तिच्या घराजवळून सोबत घेतले होते. पीडिता जेव्हा मोहम्मद याच्यासोबत गेली तेव्हा तिच्या घरी कोणीच नव्हते. वडील घरी नव्हते तर आई सीतापूर येथे आपल्या माहेरी गेली होती.

डीसीपी, सेंट्रल, सोमेन बरमा यांनी माहिती देताना सांगितले की, मोहम्मद कैफ याने गुन्हा कबूल करत पोलिसांना माहिती दिली. मोहम्मद याच्यासोबत पीडित तरुणी बोलत असल्याची त्याच्या मित्रांना माहिती होती. त्यांनी पीडितेला भेटण्याचा कट रचला. ठरलेल्या योजनेनुसार कैफ याने विषाल याच्या भावाची बाईक घेतली. तो गहरु गावातील जंगल परिसरात आपल्या मित्रांसोबत आला. मित्रांना जंगलात सोडून तो परत गेला आणि तरुणीला घेऊन मित्र असलेल्या ठिकाणी आला. त्यानंतर या तिघांनी मिळून पीडितेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच त्यांनी तिची हत्या केली. (हेही वाचा, Navi Mumbai: बापाने झाडल्या पोरांवर गोळ्या, एक ठार दुसरा जखमी; घटना CCTV मध्ये कैद)

आरोपी मोहम्मद कैफ याने सांगितले की, आम्हा तिघांच्या वर्तनामुळे पीडितेला मोठा धक्का बसला होता. तिने आम्हाला विरोध केला. आम्ही जबरदस्ती करताच तिने पोलिसांत तक्रार देणार असल्याचे सांगितले. तिने आमच्यापासून सुटका करुन पळण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही तिचा पाटलाग करुन तिला पकडले.

पोलिसांनी माहिती देताना पुढे सांगितले की, मोहम्मद याचा दोस्त आकाश याने पीडितेला पकडून खाली पाडले. त्यानंतर विषाल याने तिला चाकूने भोसकले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मोहम्मद याच्यासोबतच आकाश यादव आणि विशाल कश्यप या आरोपींनाही अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून चाहूही हस्तगत केला आहे.