Navi Mumbai: बापाने झाडल्या पोरांवर गोळ्या, एक ठार दुसरा जखमी; घटना CCTV मध्ये कैद
Shooting | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

सेवानिवृत्त सहाय्यक उपनिरीक्षका भगवान पाटील (I Bhagwan Patil) याला नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केली आहे. भगवान पाटील (वय- 73 वर्षे) यांने गोळ्या झाडून पोटच्या मुलाची हत्या केली. सोमवारी सायंकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. भगवान पाटील यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांनी त्यांना मंगळवारी अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (14 जून) सायंकाळी ही घटना घडली. पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भगवान पाटील हे ऐरोली येथील घरी आपल्या राहतो. घटना घडली त्या दिवशी त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले होते.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, भगवान पाटील यांना विजय (33) आणि सुजय (31) अशी दोन मुले आहेत. विजय पालघर जिल्ह्यात वसई येथे राहतो. तर सुज हा नवी मुंबई येथील परिसरातच राहतो. काही कौटुंबीक विषयांची चर्चा करण्यासाठी पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले होते. (हेही वाचा, यवतमाळ: जमिनीच्या वादातून मुलाने केली बापाची हत्या, कुत्र्याला खायला घातले मांसाचे तुकडे)

कौटुकंबिक विषयावर चर्चा करताना त्यांच्यात काही वाद झाले. प्रदीर्घ चर्चा, वाद-विवादानंतर भगवान पाटील यांनी अचानक आपले परवाना असलेले पिस्तूल काढले आणि दोन्ही मुलांवर गोळीबार केला. पाटील याने आपल्या पिस्तूलातून एकून तिन वेळा गोळीबार केला.

पाटील याने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक विजय याच्या पोटात आणि दुसरी खांद्याला लागली. एक सुजय याला लागली. गळीबाराचा आवाज येताच परिसरात एकच खळबळ उडाली. विजय याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयातआले. परंतू, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सुजय याच्यावर उपचार सुरु आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अटक केली.