LPG Cylinder Booking via Paytm: घरगुती गॅसच्या (Cooking Gas) दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात तीन वेळा वाढ झाली आहे. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला देखील गॅसदर 25 रुपयांनी वाढले. त्यामुळे घरगुती गॅस 125 रुपयांनी महागला आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवर निश्चितच होत आहे. अशातच जर तुम्ही पेटीएमवरुन (Paytm) गॅस बुकींग केल्यास तुम्हाला सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त मिळेल. यासाठी तुम्हाल बुकींगनंतर तुम्हाला हे छोटेसे काम करायचे आहे.
जर तुम्ही पेटीएमवरुन एलपीजी गॅस सिलेंडर बुक केले तर तुम्हाला त्याबरोबर स्क्रॅच कार्ड दिले जाईल. त्यात तुम्हाला 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक किंवा शॉपिंग व्हाऊचर मिळू शकेल. कॅशबॅक मिळविण्यासाठी, आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर आपण एलपीजी बुक करू शकता आणि कॅशबॅकचा लाभ देखील घेऊ शकता.
फॉलो करा 'या' स्टेप्स:
# पेटीएम वरून एलपीजी बुकिंगवर कॅशबॅक मिळविण्यासाठी तुम्हाला पेटीएम अॅपवर जाऊन लॉगिन करावे लागेल.
# त्यानंतर बुक गॅस सिलेंडर या पर्यायावर जा आणि आपला गॅस प्रदाता निवडा.
त्यात भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन असे बरेच पर्याय असतील.
# ग्राहक क्रमांक किंवा मोबाइल नंबर किंवा एलपीजी आयडी लिहावा लागेल.
# आवश्यक तपशील भरल्यानंतर खालील ऑफरमध्ये 100 रुपयांच्या मथळ्यासह पर्याय निवडा. यानंतर आपल्याला योग्य कॅशबॅक मिळेल.
# याचा फायदा एलपीजी 100 प्रोमो कोडद्वारे घेऊ शकता.
दरम्यान, युजर्स या स्कीमचा केवळ एकदाज लाभ घेऊ शकतात. पेटीएमवरुन पहिल्यांदा गॅस सिलेंडर बुक करत असला तर तुम्हालाही याचा लाभ घेता येईल. याचा फायदा घेण्यासाठी कमीत कमी 500 रुपयांचे पेमेंट करावे लागेल.
31 मार्च 2021 पर्यंत या योजनेची व्हॅलिडीटी असेल. सिलेंडर बुक केल्याच्या 24 तासांत तुम्हाला स्क्रॅच कार्ड मिळेल. पण तुमचा केव्हीसी नसेल तर तुम्हाला कॅशबॅक ऐवजी गिफ्ट व्हाऊचर पाठवला जाईल.