
बेंगलुरू (Bengaluru) मध्ये 1 मार्च दिवशी रामेश्वरम कॅफे सौम्य स्फोटाच्या धक्क्याने हादरल्यानंतर आज (19 मार्च) पोलिसांनाअ बेंगलुरू मध्येच एका खाजगी शाळेजवळ रिकाम्या जागेवर स्फोटक पदार्थ आढळले आहेत. या घटनेमुळे पुन्हा बेंगलुरू मध्ये खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी या ठिकानावरून जिलेटीनच्या काड्या, डिटोनेटर्स आणि अन्य स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. हे पदार्थ शाळेजवळ एका पार्क केलेल्या ट्रॅक्टर मध्ये होते.
पोलिसांना टीप मिळाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे Bellandur police घटनास्थळी धावले. त्यांनी सारी स्फोटकं ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक माहितीनुसार सापडलेले सारे स्फोटक पदार्थ हे प्रामुख्याने कन्स्ट्रक्शन साईट वर दगड फोडण्यासाठी वापरली जातात.
पोलिसांनी suo motu case घेत या प्रकरणी आता तपास करत आहेत. नुकत्याच अनेक शाळांना इमेल द्वारा स्फोट घडवून आणण्याबाबत धमकी मिळाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सार्याचा तपास केला जात असल्याचं वृत्त आहे.
रामेश्वरम कॅफे च्या बॉम्बस्फोटात कोणीही मृत्यूमुखी पडले नाही. तसेच बॉम्ब ठेवणारा संशयित व्यक्ती सध्या सीसीटीव्ही फूटेज द्वारा पोलिसांच्या रडार वर आहे. NIA कडून तपास सुरू असून काही दिवसांपूर्वीच एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. या स्फोटानंतर 8 दिवसांतच पुन्हा कॅफे सुरू करण्यात आला आहे.