
एकीकडे भाजपवर देशातील अनेक नागरिक CAA प्रकरणावरून निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे एका भाजपच्याच महिला नेत्याने पक्षावर आरोप केले आहेत. भाजप दिल्लीच्या मुस्लिम महिला नेत्या शाझिया इल्मी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर एक मोठा आरोप केला आहे. भाजपच्या व्हॉट्सऍप ग्रुपमधील चाट लीक झाल्यामुळे हे प्रकरण अजून चिघळलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेत मुद्दाम व्यासपीठापासून दूर ठेवण्यात आलं असल्याचा आरोप शाझिया इलमी यांनी केला आहे.भाजप पक्षाच्या अंतर्गत गोटातल्या नेत्यांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. परंतु या ग्रूपवरचे मेसेज लीक झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
दरम्यान, शाझिया यांनी सांगितल्यानुसार, रामलीला मैदानावर झालेल्या मोदींच्या सभेच्या वेळी ऑल एकसेस पास केवळ भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाच देण्यात आला. परंतु, हा पास शाझिया यांना मिळाला नाही. त्यांना पत्रकारांच्या कक्षात बसण्यास सांगण्यात आलं.
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, त्यांना मुद्दाम व्यासपीठापासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु त्या असंही म्हणाल्या की या सर्वच त्या मुस्लीम आहेत याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे कृपया धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये, अशीही विनंती शाझिया यांनी केली आहे.
'एनपीआर आणि एनआरसीमध्ये काहीच फरक नाही' एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांचे खळबळजनक वक्तव्य
दरम्यान, शाझिया इलमी यांनी 2015 साली आम आदमी पार्टीमधून भाजप पक्षात प्रवेश केला होता. अखेर त्या मुलाखतीत असंही म्हणाल्या की, "हा विषय माध्यमांपरण्यात पोहोचवण्याची इच्छा नव्हती. पण भाजपच्या अंतर्गत व्हॉट्सऍप ग्रूपवरचा मेसेज कुणीतरी लीक केला आणि म्हणूनच मला त्यावर बोलावं लागत आहे. याची केंद्रीय नेत्यांनी दखल घेतली आहे."