BJP नेत्या दीपिका राणी यांनी बैठकीत नगरपालिका कर्मचाऱ्यावर चप्पलने केला हल्ला (Watch Video)
BJP Councillor Beats Civic Body Employee With Slipper (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या मथुरा (Mathura) वृंदावन (Vrindavan)  नगर निगम बैठकीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, यामागचे कारण म्हणजे, यात भाजप नेत्या दीपिका राणी (BJP Leader Deepika Rani)  या चक्क एका नगर पालिका आयुक्तांवर चप्पल घेऊन हल्लाबोल करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर यावेळी त्यांना रोखण्यासाठी पुढे आलेल्या आयुक्तांच्या सेक्रेटरीची त्यांनी आपल्या पायातील चप्पलेने धुलाई केल्याचे सुद्धा व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी पार पडलेल्या एका बैठकीत नगरपालिका आयुक्त रवींद्र मंदेर आणि भाजप नेत्या दीपिका राणी यांच्यात वाद झाला आणि पुढे हा सर्व प्रकार घडल्याचे समजतेय. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. Guna Incident: 'आमची लढाई अन्याविरुद्ध', गुना येथील पोलीस शेतकरी मारहाण प्रकरणावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

प्राप्त माहितीनुसार, दीपिका आणि त्यांचे पती पुष्पेंद्र यांनी नगरपालिका आयुक्तांवर हल्ला केला आणि यावेळी मध्ये पडलेल्या सेक्रेटरीला सुद्धा चप्पलने मारले, या साठी दीपिका यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात दीपिका यांनी आपल्या बचावार्थ असे सांगितले की, "आपण मीटिंग दरम्यान महत्वाचा मुद्दा मांडत असताना आयुक्तांनी आपला हात खेचून खाली बसायला लावले म्हणून अशी प्रतिक्रिया दिली गेली".

भाजप नेत्या दीपिका राणी व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, यापूर्वी अनेक भागात असे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच हरियाणा मध्ये सुद्धा भाजप आमदार सोनाली फोगट यांनी आपल्या चप्पलेने सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या कर्मचाऱ्याने आपल्याला शिवीगाळ केल्याचे फोगट यांनी सांगितले होते, तसे त्या व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसून सुद्धा येत होते, मात्र आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये दीपिका राणी यांनी केलेल्या आरोपाचा कोणताच पुरावा दिसत नाहीये.