BJP Bihar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांंनी देवेंद्र फडणवीस यांंच्याकडुन यशस्वी मुख्यमंंत्री बनण्याचे धडे घ्यावे-  बिहार भाजप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Archived images)

अभिनेत्री कंंगना रनौत (Kangana Ranaut)  प्रकरणात कंंगनाच्या समर्थनार्थ उतरलेल्या बिहार भाजप (Bihar BJP) ने महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांंना एक सल्ला दिल्याचे समजतेय, असा सल्ला की ज्यावरुन आता पुन्हा भाजप- शिवसेना (BJP VS Shivsena)  नवा वाद सुरु होणार असल्याचे पुर्ण संकेत आहेत. IANS च्या माहितीनुसार, बिहार भाजप प्रवक्ते डॉ. निखिल आनंद (Dr. Nikhil Aanand) यांंनी उद्ध्व ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट मुख्यमंंत्री आहेत, त्यांंनी शिवसेनेचे नाव सुद्धा आता बाबर सेना करुन घ्यावे. अगदीच काही नाही तर आता सध्या सुरु त्यांंनी आपल्या उर्वरित कार्यकाळासाठी माजी भाजप मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांंच्याकडुन यशस्वी मुख्यमंंत्री घेण्याचे धडे घ्यावे असे सांंगितले आहे. Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल - कंगना रनौत

निखील आनंंद यांंनी महाराष्ट्रात गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संंजय राउत,मुंंबई पोलिस, बीएमसी हे सगळे जण पक्षपाती वागत आहेत पण हे सगळंं काही केवळ मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंच्या आदेशाच्या इशार्‍यावर होत आहे असाही आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांंनी केवळ मुख्यमंंत्री पदासाठी आपल्या परिवाराची ओळख, विचारधारा पणाला लावली होती असेही आनंंद यांंनी म्हंंटले आहे. कंगना रनौतच्या कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही - संजय राऊत

सुशांंत सिंंह राजपुत व कंंगना रनौत च्या प्रकरणावरुन सुद्धा निखील आनंंद यांंनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंच्याविषयी बरेच कठोर शब्द उद्गारले आहेत. उद्धव यांंनी सुशांंत ना न्याय मिळवुन देण्याऐवजी उलट भुमिका घेतली, सीबीआयच्या चौकशीला विरोध केला.बॉलिवूड मधील ड्रग माफिया, मूव्ही माफिया सगळ्यांंना पाठिंंबा दिला, इतकं सगळंं करुन भागलंं नाही तर आता कंंगना शी लढायला स्वतःचे सरकार, पोलिस प्रशासन आणि शिवसेनेला सुद्धा त्यांंनी पणाला लावले आहे असे आनंद यांंनी म्हंटले आहे.