Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रनौतच्या कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही - संजय राऊत
Shiv Sena leader Sanjay Raut (PC - ANI)

Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही, असं स्पष्ट मत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात तुम्ही महापौर किंवा बीएमसी आयुक्तांशी बोलू शकता, असंही राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने शिवसेना आणि कंगनामध्ये केल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. कंगनाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडलं आहे. (हेही वाचा - Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल - कंगना रनौत)

बीएमसीकडून कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात. मात्र, सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी 'सोनिया सेना' बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका, असंही कंगनाने म्हटलं होतं.