Basant Kumar Birla | (Photo Credits: Wikimedia Commons)

बीके बिरला ग्रुप ऑफ कंपनी चेअरमन, प्रसिद्ध उद्योगपती बसंत कुमार बिरला (Basant Kumar Birla) यांचे आज (बुधवार, 3 जुलै 2019) निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. बसंत कुमार बिरला हे आदित्य बिरला ग्रुप संचालक कुमार मंगलम बिरला (Kumar Mangalam Birla) यांचे आजोबा होत. वसंत बिरला यांनी साधारण तीन महिन्यांपूर्वीच आपली ग्रुपची होल्डिंग कंपनी पिलानी इन्वेस्टमेंट अॅण्ड इंडस्ट्रीज कॉर्प च्या बोर्डावरुन हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी कुमार मंगलम यांची आई राजश्री बिरला यांची निवड केली होती.

दरम्यान, बसंत कुमार बिरला यांनी कोलकाता स्थित केसोराम इंडस्ट्रीज, जयश्री टी, सेंच्युरी टेक्सटाइल्स आणि इतर अनेक कंपन्यांची सुरुवात केली होती. त्यांचा जन्म 1921 मध्ये झाला. ते सुप्रसिद्ध उद्योगपती घनश्यामदास बिरला यांचे छोटे पुत्र होते. (हेही वाचा, UCO Bank: बिर्ला सूर्या लिमिटेड समूहाचे संचालक Yashovardhan Birla दिवाळखोर: युको बँक)

बसंत कुमार बिरला यांचा विवाह कार्यकर्ता आणि लेखक ब्रजलाल बियानी सरला यांच्याशी झाला होता. त्यांना पूत्र आदित्य बिरला तसेच, जयश्री मेहता आणि मंजूश्री खेतान अशा दोन मुली आहेत. बसंत कुमार बिरला यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे.