Donald Trump Plans India Visit: मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या संभाव्य भारत भेटीबाबत त्यांच्या सल्लागारांशी चर्चा केली आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, ट्रम्प भारत भेटीपूर्वी चीनला भेट देऊ इच्छितात. तथापी, भारत क्वाड शिखर परिषदेचे (QUAD Summit) आयोजन करणार आहे, ज्यामध्ये जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. ट्रम्प यांचा हा दौरा या वर्षी एप्रिलमध्ये किंवा या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदींना (PM Modi) या वसंत ऋतूमध्ये व्हाईट हाऊस बैठकीसाठी अमेरिकेला भेट देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आमंत्रण मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ट्रम्प चीनला भेट देण्याची शक्यता -
ट्रम्प यांनी सल्लागारांना सांगितले की, ते पदभार स्वीकारल्यानंतर चीनला जाणार आहेत. कारण ते शी जिनपिंग यांच्याशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी चीनवर जास्तीचे शुल्क लादणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले गेले होते. यासंदर्भात वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे. (हेही वाचा -Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा, हश मनी प्रकरणातील सर्व 34 प्रकरणांमध्ये बिनशर्त सुटका)
ट्रम्प यांच्या शपथविधीला एस. जयशंकर उपस्थित राहणार -
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग उपस्थित राहणार आहेत, तर ट्रम्प यांच्या शपथविधीला भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेच्या अध्यक्षीय शपथविधीला चीनचा वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असेल. ट्रम्प यांनी यापूर्वी शी जिनपिंग यांना त्यांच्या शपथविधीला आमंत्रित केले होते. परंतु, चिनी नेते कधीही परदेशी नेत्यांच्या शपथविधीला उपस्थित राहत नाहीत.