
भारतीय लष्कराने (Indian Army) सुरक्षित संभाषणासाठी 'संभव' (Sambhav) फोन चा वापर केल्याची बाब समोर आली अहे. सध्या अधिकार्यांना हाच फोन दिला जात आहे. मागील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या चीन सोबतच्या संभाषणामध्येही याच 'संभव' फोनचा वापर करण्यात आला होता. आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी (Army chief Gen Upendra Dwivedi) यांनी वार्षिक प्रेस कॉन्फरंस मध्ये त्याची माहिती दिली आहे. सध्या लष्करात अधिकार्यांना दएण्यासाठी 30 हजार फोन देण्यात आले आहेत. संवेदनशील माहिती देण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र अॅप वरून ती शेअर केली जात आहे. अशी माहिती ANI ला सूत्रांनी दिली आहे.
स्मार्टफोनचा हा प्रोजेक्ट मागील वर्षी लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप प्रमाणे मेसेजिंग साठी M-Sigma अॅप बनवण्यात आले आहे. या अॅप द्वारा डॉक्युमेंट्स, फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात. आर्मीला अशी आशा आहे की internal smartphones हे Airtel आणि Jio मोबाईल नेटवर्क्स वर वापरले गेल्यास महत्त्वाची कागदपत्र लीक होण्याचा धोका कमी आहे. अनेक भारतीय सैन्य अधिकारी माहिती आणि कागदपत्रे शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि इतर त्यासारखीच अॅप्स वापरत होते आणि जवळजवळ सारीच डॉक्युमेंट्स सार्वजनिक डोमेनमध्ये लीक होत आहेत.
फोनमध्ये सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे नंबरही आहेत आणि अधिकाऱ्यांना नंबर सेव्ह करण्याची गरज नाही, असे सूत्रांनी सांगितले. ताबडतोब कनेक्टीव्हिटी आणि सुरक्षित संभाषणासाठी इंडियन आर्मीने "end-to-end secure mobile ecosystem" उभारली आहे.