Saif Ali Khan Stabbing Case: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला 5 दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांनी असेही म्हटले आहे की, हा आंतरराष्ट्रीय कट आहे की नाही याचा तपास करायचा आहे. अभिनेत्यावर 17 जानेवारी रोजी पहाटे 2:00 वाजता त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला करण्यात आला. नंतर त्याला पहाटे 3:00 वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान, सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा काढण्यात आला होता. डॉक्टरांनी सांगितले की, अभिनेता आता धोक्याबाहेर आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी -
मुम्बई की बांद्रा कोर्ट ने सैफ अली खान पर हमला करने वाले आरोपी को 5 दिन की पुलिस हिरासत में भेजा#saifalikhanattack #kareenakapoorkhan #mumbaipolice@imvivekgupta @anchorsapna pic.twitter.com/0uADI5g7Ra
— News18 India (@News18India) January 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)