Photo Credit- Pixabay

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला (Dharamshala) येथे पॅराग्लायडिंग दरम्यान एक मोठा अपघात झाला. यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथील एका 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पॅराग्लायडिंग () सहाय्यक मार्गदर्शकाला किरकोळ दुखापत झाली. कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात 24 तासांत दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. हे पर्यटक गुजरात आणि तामिळनाडूचे असल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबादमधील एका 19 वर्षीय मुलीचा धर्मशाळेत मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास इंद्रु नाग पॅराग्लायडिंग टेक-ऑफ पॉइंटवर हा अपघात झाला. या अपघातात पॅराग्लायडिंग सहाय्यक मार्गदर्शकाला किरकोळ दुखापत झाली.

मुलगी तिच्या कुटुंबासह पर्यटनाला आली होती

धर्मशाला येथे उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव खुशी भावसार असे आहे. ती गुजरातमधील अहमदाबाद येथील नारनपुरा येथील सहजानंद अव्हेन्यू येथील आहे.

जखमी पायलटची ओळख पटली

पॅराग्लायडिंग पायलटची ओळख पटली आहे. तो मुनीश कुमार असून कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा येथील ताहू चोला गावचा रहिवासी आहे. या अपघातात मुनीशला किरकोळ दुखापत झाली आणि तो सुखरूप बचावला.

पॅराग्लायडरचा तोल गेला

प्राथमिक माहितीनुसार, पॅराग्लायडरने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्याचा तोल गेला. ज्यामुळे दोघेही जमिनीवर पडले. खुशीला गंभीर दुखापत झाली आणि तिला ताबडतोब धर्मशाळेतील झोनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. पायलट मुनीश कुमार यांना किरकोळ दुखापत झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

दुसऱ्या एका घटनेत, शुक्रवारी संध्याकाळी कुल्लू जिल्ह्यातील गरसा लँडिंग साईटजवळ पॅराग्लायडिंग करताना तामिळनाडूतील एका २८ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. या घटनेतही पायलट गंभीर जखमी झाला आहे. पॅराग्लायडर अ‍ॅक्रोबॅटिक्स करत असताना आणि ते चुकून दुसऱ्या पॅराग्लायडरशी आदळल्याने हा अपघात झाला. यापैकी एक जमिनीवर पडला. हा अपघात जमिनीपासून १०० फूट उंचीवर झाला. या अपघातात जयस रामचा मृत्यू झाला तर पायलट अश्विनी कुमार गंभीर जखमी झाले.