Ruby and Anaconda Video Original (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Ruby and Anaconda Video Original: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता सोशल मीडियावर एका मुलीचा आणि अॅनाकोंडाचा व्हिडिओ (Anaconda Video) व्हायरल होत आहे. अखेर आता या व्हिडिओमागील गुढ उलगडले आहे. व्हिडिओमध्ये अॅनाकोंडासोबत दिसणाऱ्या तरुणीचं नाव लॉरा लिओन (Laura Leon) असून ती अमेरिकेतील रहिवाशी आहे. तिचे अधिकृत इंस्टाग्राम हँडल लॉरैसाबेलेऑन असे आहे. गेल्या काही दिवसांपासून 'वन गर्ल वन अॅनाकोंडा' (One Girl One Anaconda) असे शिर्षक असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. या व्हिडिओमध्ये एक महिला निर्भयपणे बाथटबमध्ये बसलेली दिसते आणि तिच्या शरीराभोवती एक महाकाय अॅनाकोंडा गुंडाळलेला दिसतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये, ती मुलगी अॅनाकोंडाला मिठी मारताना, प्रेम करताना आणि चुंबन घेतानाही दिसते.

लॉरा लिओनच्या व्हिडिओवर नेटीझन्सच्या प्रतिक्रिया -

लौराचे इन्टाग्राम फीड अशा 'निर्भय' कृतींनी भरलेले आहे. जिथे, ती या धोकादायक अॅनाकोंडाशी जवळचे नाते शेअर करते. तिचे इंस्टाग्रामवर जवळजवळ 20 लाख फॉलोअर्स आहेत. अनेकांनी या वन्य प्राण्यांशी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांशी असलेल्या तिच्या जवळीकतेबद्दल तिला इशारा दिला आहे. या विशिष्ट बाथटब व्हिडिओखाली नेटीझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहे. यातील एकाने लिहिले आहे की,"अरे, साप तुला खाईल. तो पाळीव प्राणी नाही. काळजी घे", तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, 'तुझे दिवस मोजले जात आहेत??????'

'वन गर्ल वन अॅनाकोंडा' व्हायरल व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Laura Leon (@lauraisabelaleon)

लॉरा तिच्या अॅनाकोंडासोबत झोपते, पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Laura Leon (@lauraisabelaleon)

यापूर्वी, 'वन गर्ल, वन अॅनाकोंडा' व्हायरल व्हिडिओ फिशिंग लिंक तसेच पॉर्न फिल्म उघडण्यासाठी लिंक असल्याचे गृहीत धरले जात होते. परंतु, कंटेंट क्रिएटर्सपैकी एकाने असेही सुचवले की हा व्हिडिओ 'रुबी अँड अॅनाकोंडा' या कथेबद्दल आहे.