Jeet Adani and fiancee (Photo Credits: Instagram)

Jeet Adani Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) च्या भव्य लग्न सोहळ्यानंतर, आता भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल अटकळ बांधली जात आहे. गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासंदर्भातील विविध बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, नेटीझन्समध्ये या भव्य समारंभाबद्दल उत्साह वाढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या मुलाचे लग्न अंबानी यांच्या मुलाच्या समारंभाप्रमाणे भव्य असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी (Jeet Adani) 12 मार्च 2023 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एका साध्या समारंभात दिवा जैमिन शाहशी विवाहबद्ध झाला. या लग्न समारंभाला फक्त जवळचे कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. दिवा ही सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक आणि हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी आहे. (हेही वाचा -Gautam Adani 2 अब्ज डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात अडकले, अमेरिकेने केले गंभीर आरोप, अटक वॉरंट जारी)

ट्रॅव्हिस स्कॉट आणि हनी सिंग परफॉर्म करणार?

सध्या जीत अदानी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अफवांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जीत अदानीच्या लग्न समारंभात हनी सिंग आणि ट्रॅव्हिस स्कॉटसह जगातील काही मोठे कलाकार एकाच छताखाली परफॉर्म करणार आहेत. (वाचा - Adani One App: गौतम अदानी यांच्या कंपनीने लाँच केले नवे ॲप; अतिरिक्त शुल्काशिवाय बुक करू शकाल स्वस्त ट्रेन, फ्लाइट आणि बस तिकीट)

हनी सिंग आणि ट्रॅव्हिस स्कॉट एकाच कार्यक्रमात -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Telly Tashan (@tellytashan)

जीत अदानीच्या लग्नात 1 हजारहून अधिक लक्झरी गाड्या -

जीत अदानी यांचे लग्न एक अविस्मरणीय सोहळा असणार आहे, पाहुण्यांना नेण्यासाठी 1 हजारहून अधिक लक्झरी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे जीतच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना एक अखंड आणि आलिशान प्रवास अनुभवता येणार आहे.

58 देशांमधील शेफ -

लक्झरी गाड्यांव्यतिरिक्त, जीत अदानीच्या लग्नात आंतरराष्ट्रीय पाककृतींचा अनुभवही घेता येणार आहे. या कार्यक्रमात जागतिक चवीचे मिश्रण आणून 58 वेगवेगळ्या देशांतील शेफ विविध पदार्थ तयार करणार आहे. हे वैविध्यपूर्ण आणि स्वादिष्ट जेवण पाहुण्यांना नक्कीच आनंद देईल आणि लग्नाच्या भव्यतेत भर घालेल.

जीत अदानीच्या लग्नाला जगभरातील स्टार राहणार उपस्थित -

या लग्नात मनोरंजन क्षेत्रातील काही मोठे दिग्गज कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काइली जेनर, केंडल जेनर, सेलेना गोमेझ आणि सिडनी स्वीनी यासारखे आंतरराष्ट्रीय स्टार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या सर्व भव्य गोष्टींमुळे जीत अदानी यांचे लग्न या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरणार आहे.