बिहार: धक्कादायक! छेडछाडीला नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करत आई-मुलीचे केले मुंडन
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बिहार (Bihar) येथे काही व्यक्तींनी एका महिलेच्या घरात घुसून छेडछेड करण्याचा प्रयत्न केला. मात्र छेडछाडीला विरोध केला असता आरोपींनी घरातील महिलेला आणि मुलीला मारहाण केली. त्याचसोबत या दोघींचे केस कापून त्यांना गावातील रस्त्यांवर फिरवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वैशाली जिल्ह्यात पीडित महिला आपल्या मुलीसोबत एकटीच राहते. तर नवरा भिक्षा मागून परिवाराचे पोट भरतो. परंतु संध्याकाळच्या वेळेस काही व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसत महिलेच्या मुलीसोबत छेडछाड करण्यास सुरुवात केली. परंतु पीडित महिलेने आणि मुलीने या प्रकाराला विरोध केल्याने दोघींना घरात घुसलेल्या व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली.(महाराष्ट्रात बिहार येथून अल्पवयीन मुलांची तस्करी, RPF च्या कारवाईमुळे खुलासा)

या प्रकरणी महिलने आणि मुलीने पोलिसात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तर पोलिसांनी दोघींसोबत छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.