
दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा या विद्यार्थ्यांना करियरच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट असतात. बिहार मध्ये एका विद्यार्थीनीने तिच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहलेल्या नोटचा फोटो सध्या वायरल होत आहे. काही जण उत्तरपत्रिकेत कविता लिहून ठेवतात काही भावनिक मेसेज पण एका विद्यार्थिनीने दहावीच्या उत्तरपत्रिकेमध्ये मॉडरेटरला आपल्याला दहावी मध्ये उत्तीर्ण करा नाहीतर आपले वडील आपलं लग्न लावून देतील अशी नोट लिहली आहे. ही घटना Arrah च्या Model School मधील आहे. शिक्षक पेपर तपासत असताना त्याला ही नोट मिळाली.
हिंदीमध्ये लिहलेल्या या नोटमध्ये 'माझे वडील शेतकरी आहेत. आम्ही शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही. त्यामुळे त्यांची आमच्या शिक्षणाला नापसंती आहे. जर आम्हांला चांगले गुण मिळाले नाहीत तर आम्हांला पुढे शिकू दिले जाणार नाही. आमचं लग्न लावलं जाईल. आम्ही गरीब घरातून आहोत कृपया मला वाचवा' असं या नोटमध्ये संदेश आहे.
जबलपूर मध्येही असाच प्रकार समोर आला आहे. उत्तर पत्रिकेमध्ये विद्यार्थिनीने मला किमान पास होण्यापुरते मार्क्स द्या नाहीतर माझं लग्न लावलं जाईल असं त्यामध्ये लिहलं आहे. नक्की वाचा: Madya Pradesh Shocker: मुलाची 10वीच्या बोर्डाची उत्तर पत्रिका बदलताना शिक्षकाला पकडले रंगेहात, 4 पर्यवेक्षकांना निलंबित .
दरम्यान विद्यार्थी जेव्हा अशाप्रकारे नोट्स लिहितात तेव्हा त्यांना त्याच्या आधारे पास केलं जाऊ शकत नाही. अशी उत्तरं प्रश्नाला अनुसरून उत्तर नसल्याने त्याला थेट शून्य मार्क्स दिले जातात. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी अशाप्रकारे उत्तरपत्रिकेत इमोशनल पोस्ट लिहित असल्याचं समोर येत असल्याचं पेपर तपासणारे शिक्षक सांगतात.
बिहार शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत किमान 30% आणि प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये 40 % गुण आवश्यक आहेत.