बिहार मधील आरा येथील सोशल मीडियात एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या ठिकाणी एका पिंजऱ्यात बारबालांना नाचवले जात असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून येत आहे. यामुळे रस्त्यांवर बघ्यांची तुफान गर्दी होत लॉकडाऊन नियमांचे खुलेआम उल्लंघन झाल्याचे दिसून आले. हे प्रकरण भोजपुर जिल्ह्यातील कोईलवर प्रखंड येथील आहे. येथील एका लग्नसमारंभादरम्यान बारबालांना पिंजऱ्यात बंद करुन नाचण्यास सांगण्यात आले होते. तर बाहेर असलेल्या लोकांकडून त्यांना पाहून हूल्लडबाजी सुरु होती.(Child Pornography In Kerala: केरळ पोलिसांनी चाइल्ड पोर्न प्रकरणात 28 जणांना केली अटक; 370 गुन्हे दाखल)
बिहारमध्ये महिला सशक्तीकरणानुसार त्यांना 50 टक्के आरक्षण दिले आहे. अशातच लग्नात बारबारालांना पिंजऱ्याक कैद करुन त्यांना नाचवणे हे लोकांच्या मानसिकतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थितीत करण्यासारखे आहे. पिंजऱ्यात बंद असलेल्या बारबाला रात्रभर डान्स करत होत्या. मोहम्मद नकीब यांच्या मुलीचा विवाह होता. असे सांगितले जात आहे की, बारबालांना नाचण्यासाठी 4 हजार रुपये दिले होते. तसेच त्यांना मुजफ्फरपुर येथून नाचण्यासाठी आणले होते.(धक्कादायक! 14 वर्षांच्या मुलासोबत पळून गेली दोन मुलांची आई; लैंगिक संबंधही ठेवले, POSCO अंतर्गत गुन्हा दाखल)
व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी असे म्हटले की, बारबालांना आपले पोट चालवण्यासाठी हे काम करावे लागत आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. व्हिडिओत असे दिसून आले की, बारबाला थकल्या तरीही त्यांना बसण्याऐवढी जागा सुद्धा पिंजऱ्यामध्ये नव्हती. दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले आहे.