बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे शनिवारी एका डेअरी कारखान्यात अमोनिया वायूच्या गळतीमुळे एका मजुराचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गळतीचे कारण अद्याप समजू शकले नसून त्याचा शोध सुरू आहे. हाजीपूर येथील राज फ्रेश डायरीमध्ये अमोनिया गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याची घटना रात्री घडली. पोलिस, अग्निशमन दल आणि क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) पाटणा येथून घटनास्थळी दाखल झाली. (हेही वाचा - Fire Broke In Bhiwandi: भिवंडीत गोदामाला भीषण आग, कोट्यवधींच नुकसान)
कारखान्यातून निघणारा अमोनिया वायू हवेत पसरला आणि चार किलोमीटरपर्यंत राहणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसला. त्यांच्यापैकी डझनभरांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काहींना गॅस श्वास घेतल्यानंतर आजारी पडले. अमोनिया वायूचा श्वास घेतल्याने बाधित झालेल्या सुमारे 30 ते 35 जणांवर हाजीपूर सदर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दाखल झालेले बहुतेक रुग्ण हे रस्त्यावरून जाणारे किंवा कारखान्यापासून जवळ राहणारे लोक होते.
1 killed, over 30 admitted to hospital after inhaling ammonia gas in Bihar's Hajipur
Read @ANI Story | https://t.co/9uGxYEz76Q#Bihar #AmmoniaGas #Hajipur pic.twitter.com/ly9e7Fn1wv
— ANI Digital (@ani_digital) June 25, 2023
सर्वांची प्रकृती स्थिर आणि सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 15 ते 20 मिनिटांत गॅसगळती आटोक्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. असे असतानाही अग्निशमन दल आणि पाटणा क्यूआरटीची टीम कारखान्याच्या आवारात उपस्थित होती.