भिवंडी (Bhiwandi Fire) येथे पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. भिवंडीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. वळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोब कॉम्प्लेक्स या गोदामला (Godown) आग लागली. या आगीमुळे एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रो ओव्हन असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आग (Fire) इतकी भीषण होती की चार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीमुळे गोदामामध्ये साठविलेली कोट्यवधी रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. (हेही वाचा - Waterlogging at Mumbai: 'धादांत खोटे बोलणारे हे सरकार'; पहिल्या पावसामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी; शहर काँग्रेसच्या अध्यक्षा Varsha Gaikwad यांची शिंदे सरकारवर टीका)
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.आग पाहता पाहता भडकत गेल्यानं चार गोदामात पसरली. या आगीच्या भक्ष्यस्थानी गोदामामध्ये साठवलेली कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे आणि कल्याण येथील अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतू पाण्याचा तुटवडा भासत असल्यानं त्यात एसी फ्रिज यांचे कॉम्प्रेसर फुटत असल्याने आग पुन्हा पुन्हा भडकत होती.
पाण्याच्या कमतरतेमुळे कल्याण (Kalyan) व ठाणे (Thane) येथील अग्निशामक दलाला सुध्दा पाचारण करण्यात आले आहे. सुदैवाने आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी सहा ते सात तास लागणार असल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.