Bridge | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

बिहार (Bihar) राज्यातील रोहतास (Rohtas District) जिल्ह्यातील एका गावात विचीत्र चोरी झाली आहे. या ठिकाणी असलेल्या एका नदीवरील 60 फूट लांबीचा लोखंडी पूल (Bridge) चक्क चोरीला गेला आहे. रोहतास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सूत्रधारासह आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात दोन सरकारी अधिरकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.या दोनपैकी एक उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) आहे तर दुसरा हवामान विभागातील. चक्क पूलच चोरी झाल्याने परिसरातील घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तसेच, इतका मोठा पूल चोरीला जाईपर्यंत प्रशासन काय करत होते, असाही सवाल उपस्थित करुन आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

आरोपींनी दिवसाढवळ्या चक्क एक 60 फूट लांबीचा सरकारी पूल पाडला. त्यासाठी आरोपींनी आपण सिंचन विभागाचे सरकारी अधिकारी असल्याचा बहाना केला. कारवाई करत असल्याचे दाखवून हो पूल खाली पाडला. पुलासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाचे छोटे छोटे तुकडे केले. हे लोखंड एका वाहनात भरुन आरोपी फरार झाले. पोलिसांनी सांगितले की,साधारण 500 टन इतके लोखंड वापरण्यात आलेला हा पूल नसीरगंज पोलीस ठाणे हद्दीतील अमियावर गावातील अर्राह तलावावर 1972 मध्ये उभारण्यात आला होता.

पोलिसांनी म्हटले आहे की, तपासामाध्ये आम्हाला आढळून आले की, हवामान विभागाचे अधिकारी अरविंद कुमार यांनी एका टोळीचे नेतृत्व केले. जी टोळी गॅस कटर आणि इतर सामग्रीयुक्त होती. त्यांनी काही दिवसांपूर्वीच हा पूल उद्ध्वस्त केला. या प्रकरणात आम्ही काही आरोपींना अटक केले आहे. त्यात आम्हाला माहिती मिळाली की, एसडीओ राधे श्याम सिंह या सर्व प्रकरणाचे सूत्रधार होते. त्यांनीच पूल चोरीची योजना आखली. एसडीओसोबत त्यांचे इतर सहकाऱ्यांनाही अटक करण्या आलीआहे. (Mumbai Cyber Crime: मुंबईतील व्यक्तीला ऑनलाईन दारु मागवणे पडले महागात, दुकानातील कर्मचारी सांगत अज्ञाताकडून 3.45 लाखांची फसवणूक)

धक्कादायक म्हणजे पूल चोरण्यासाठी आरोपींनी गॅस कटर, जेसीबी मशीन, पिकअप व्हॅन अशी काही वाहने आणि साधने वापरली. पोलिसांनी आरोपींसोबत त्यांनी चोरीसाठी वापरलेली सामग्रीही जप्त केली आहे.