Pahalgam Terror Attack (फोटो सौजन्य - ANI, Edited Image)

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahalgam Terror Attack) मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे (NIA) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने चौकशीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आता एनआयए याप्रकरणी गुन्हा दाखल करून या या प्रकरणाची चौकशी करेल. एनआयए स्थानिक पोलिसांकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाची केस डायरी आणि एफआयआर घेईल. एनआयएची टीम पहलगाममध्ये पोहोचली असून पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. एनआयएसोबत, त्यांची फॉरेन्सिक टीम देखील पहलगाममध्ये उपस्थित आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला -

22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:45 ते 3:00 च्या दरम्यान काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. हे ठिकाण अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामपासून 6-7 किमी अंतरावर बैसरन खोऱ्यात होते. त्याला 'मिनी स्वित्झर्लंड' असेही म्हणतात. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. या ठिकाणी दहशतवादी बैसरन खोऱ्यात घुसले. त्यांच्याकडे AK-47, M4 कार्बाइन आणि इतर स्वयंचलित शस्त्रे होती. काही दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेरे घातले होते. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई; संशयित दहशतवाद्यांच्या घरावर बुलडोजर)

या दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांकडे त्यांची नावे, धर्म आणि ओळखपत्रे मागितली. काहींना कलमा म्हणण्यास सांगण्यात आले. यानंतर, त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. काही पर्यटकांना त्यांच्या धर्माची पुष्टी करण्यासाठी त्यांचे पँट काढण्यास सांगण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Pakistan Violates Ceasefire: नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर)

या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची संलग्न संघटना आणि पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने स्वीकारली. त्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद होता, जो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील रावलकोट येथून काम करतो. त्याने एक महिना आधीच हल्ल्याची सूचना दिली होती. हल्ल्यानंतर दहशतवादी डोंगर आणि जंगलात पळून गेले.