सध्या बँकेकडून येणारे मेसेजेसकडे लोक जास्त दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. तर न पाहताच मेसेज डिलिट करुन टाकतात. मात्र ग्राहकांनो तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. काही वेळेस बँकेकडून महत्वाची माहिती देण्यासाठी मेसेज पाठवले जातात. त्यामुळे सध्या स्टेस्ट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) त्यांच्या ग्राहकांना एक महत्वाचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवत आहे.
स्टेट बँक पाठवत असलेल्या मेसेजमध्ये केवायसी डॉक्युमेंट (KYC Document) अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवले जात आहे. जर हे कागदपत्र अपडेट न केल्यास बँक अकाउंटमधून पैसे भरण्यास किंवा काढण्यास त्रास होणार आहे. तसेच बँक अकाउंट बंद होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. आरबीआय बँकेने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे केवायसी कागदपत्र असणे अनिवार्य केले आहे.(हेही वाचा-SBI मध्ये नोकरीची संधी; पाहा कसा आणि कुठे कराल अर्ज?)
तुम्ही केवायसी कागदपत्र अपडेट केले नसेल तर हे करा:
जर तुम्ही स्टेट बँक मधील अकाउंट सोबत केवायसी कागपत्र अपडेट केले नसल्यास, जवळच्या सेस्ट बँकेच्या शाखेत जाऊन अपडेट करावे. तसेच केवायसीसाठी पासपोर्ट, वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा NREGA असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते अपडेट केले जाणार आहे. मात्र ज्या ग्राहकांचे खाते 10 वर्ष जुने असल्यास त्यांनी ज्याच्या नावावर अकाउंट आहे त्याचे आयडी प्रुफ असणे आवश्यक असणार आहे.