प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

भिंड (Bhind) येथे, पोलिस आणि प्रशासनाने संयुक्त कारवाई करत, फूप कछुएच्या रामनगर भागात कार्यरत असलेल्या डेअरीवर (Milk Dairy)  छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात बनावट दूध (Fake milk) तयार करण्याचे साहित्य जप्त केले गेले. तसेच घटनास्थळी प्रशासनाने पाच हजार लिटर बनावट दूध नष्ट केले. मात्र, दुग्ध संचालक धीरेंद्रसिंग भदौरिया त्या ठिकाणावरून फरार झाला.

फूपच्या रामनगर भागात संचालित, सुधीर डेअरी येथे भेसळयुक्त व कृत्रिम दूध बनविल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सतत येत होत्या. बुधवारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला.

अन्न विभागाच्या पथकाने (FDA) व पोलिस दलाने ही कारवाई केली. त्यावेळी घटनास्थळावरून बनावट दूध बनवण्यासाठी वापरला जाणारा हायड्रोजन, वंगण, क्रिप्टो तेल, एक विषारी पदार्थ ताब्यात घेतला. काडेपेटीच्या संपर्कात येताच 100 टक्के शुद्ध स्प्रिट (इथेनॉल), शॅम्पू (Shampoo) आणि हायड्रोजन यासारख्या घातक रसायनांमधून डेअरीमध्ये बनावट दूध तयार केले जात होते. सिंथेटिक दूध करण्यासाठी 20 पोटी दुधाची पावडर, 17 पोती माल्टोडेक्सट्रिन पावडर,  180 लीटर हायड्रोजन, 600 लिटर कच्चा पाम तेल, 19 कार्टून रिफाइंड, 20 कॅन शॅम्पू, 3 बाटल्या इथेनॉल असे साहित्य सापडले. या सर्वांची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले गेले आहे. पथकाने सर्व सामान जप्त केले. (हेही वाचा: बाजारात येणार झुरळाचे दुध; गायी आणि म्हैशीच्या दुधापेक्षा आहे पौष्टिक, जाणून घ्या फायदे)

याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी छोटे सिंह, एएसपी संजीव कांचन घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांच्या मते, अशा प्रकारच्या दुधाचे सतत सेवन केल्यामुळे, आतड्यांसंबंधी जळजळ, मूत्रपिंड विकार आणि कर्करोग यासारख्या धोकादायक आजाराची शक्यता असते. अन्न सुरक्षा अधिकारी ओमनारायण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुग्धशाळेतील दोन्ही गोदामे सील केली आहेत. तसेच डेअरी ऑपरेटरविरोधात एफआयआरही नोंदवण्यात येणार आहे.