
Barshi Police Booked Against Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सोलापूरातील बार्शी पोलीस (Barshi Police) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका अत्याचारपीडित तरुणीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोत पीडित तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होती. या फोटोवरुनच दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर सामायिक केलेल्या फोटोवरुन राजकीय टीकाही झाली होती. दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राऊत यांच्यावरील आणखी एका गुन्ह्यात वाढ झाली आहे.
पीडित तरुणीचे छायाचित्र समाजमाध्यमांवरुन सामायिक करताना राऊत यांनी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले होते. सोबतच पोस्टमध्ये लिहीले होते की, "देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत." (हेही वाचा, Sanjay Raut Statement: हा सगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खेळ, Dhirendra Shastri यांच्या मुंबईतील दरबारावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया)
ट्विट
प्रिय, संजुभाऊ,
6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासात अटक करण्यात आली.
याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.@rautsanjay61 @BJP4Mumbai https://t.co/J5JSo9fjSe
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 18, 2023
दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनीही संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, ''प्रिय, संजुभाऊ, 6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासात अटक करण्यात आली. याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे''.
ट्विट
ओ सर्वज्ञानी……खोटी माहीती देत का जनतेची दिशाभूल करताय…..?? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात
या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली आता ही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असतांना का तुम्ही खोटी माहीती देताय…
आरोपी भाजपपुरस्कृत… https://t.co/LJPrtebuhb
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 18, 2023
दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी हे छायाचित्र सामायिक करताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. संजय राऊत यांनी हे छायाचित्र व्हायरल केल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. शिवाय, महिला आयोगाने राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी केली होती.