देशामध्ये भारतीय बॅंक महासंघ (IBA) सोबत पगारवाढी बाबत सुरू असलेल्या वाटाघाटी असफल ठरत असल्याने बॅंक कर्मचार्यांच्या संघटनांकडून यंदा 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी दिवशी अशा दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. दरम्यान यंदा 1 फेब्रुवारी दिवशी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2020 संसदेमध्ये मांडला जाणार आहे. यंदा अर्थसंकल्पाच्या दिवशीचा देशभरातील बॅंकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. सोबतच मार्च महिन्याही 11, 12 आणि 13 मार्च दिवशी बॅंक बंद राहणार आहे.
फेब्रुवारी या नव्या महिन्याच्या पहिल्याच शनिवारी देशातील खाजगी, सरकारी आणि सहकारी बॅंका बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हा निर्णय आयबीए कडून घेण्यात आलेल्या आडमुठी भूमिकेच्या निषेधार्थ असल्याचे बॅंकेच्या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. बॅंक कर्मचारी 11,12 आणि13 मार्च दिवशी देखील संप करण्याच्या भूमिकेत आहेत. वेळेत तोडगा न निघल्यास 1 एप्रिल पासून बेमुदत संप करण्याचा इशारा बॅंक संघटनांनी दिला आहे. Maharashtra Public Holiday 2020 List: महाराष्ट्र सरकारकडून 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 13 जानेवारी नव्या वेतन रचनेबाबत मीटिंग झाली असून
UFBU च्या सिद्धार्थ खान यांनी PTI या वृत्त संस्थेला दिलेल्या माहिनुसार,
1 एप्रिलपासून युनियनकडून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या UFBU कडून 15% पगारवाढीची मागणी आहे. परंतू IBA कडून 12.25% वाढ दिली जात आहे.