Bank Strik On March 27: केंद्र सरकारने देशातील जवळपास 10 बँकांचे विलीनीकरण (Bank Merger) केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बँकिंग सेक्टरमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचे ठरवले आहे. भारतातील बँकिंग सेक्टरमधी दोन बड्या संघटना ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोशिएशन (AIBEA) आणि बँक ऑफिसर्स असोशिएशन (AIBOA) यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. या दोन्ही संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील बँक कर्मचारी येत्या 27 मार्च या दिवशी संपावर जाणार आहेत.
बँक कर्मचाऱ्यांचा संप एक दिवसाचा (27 मार्च) असला तरी 28 आणि 29 मार्च या दिवशी अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवार येत आहे. त्यामुळे बँका सलग 3 दिवस बंद राहणार आहेत. बँका सलग 3 दिवस बंद राहिल्यामुळे कार्यालयांमधून होणारे बँकिंग व्यवहार ठप्प होणारच आहेत. परंतू, त्याचा फटका एटीएमलाही बसण्याची शक्यता आहे. काही एटीएममध्ये पैसे नसल्याच्या घटना घडू शकतात. दरम्यान, इंटरनेट बँकिंग मात्र सुरु राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, ठाणे: Yes Bank चा ग्राहक नसूनही व्यावसायिकाला कोट्यावधीची नोटीस जारी)
कोणती बँक कोणत्या बँकेत होणार विलिन
- पंजाब नॅशनल बँक (PNB) होणार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये होणार विलिन
- कॅनरा बँक होणार सिंडिकेट बँकेत विलिन
- यूनियन बँक होणार आंध्रा बँक आणि कॉपरेशन बँकेसोबत विलिनिकरण होणार
- इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक होणार विलिन
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरस आपला प्रभाव वाढवत आहे. त्यामळे देशभरांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कठोर प्रयत्न करत आहे. जेणेकरुन कोरोना नियंत्रणात राहिली. सर्व प्रकारचे संप, आंदोलने या काळात मागे घेतली जावीत. यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा हा संप सुरु राहणार की मागे घेतला जाणार याबाबत उत्सुकता आहे.