Festival Special Trains: सध्याच्या दिवाळीच्या (Diwali 2024) सणासुदीच्या दिवसांत मुंबईमधील अनेक लोक, कामगार, कर्मचारी आपापल्या गावी जात आहेत. यामुळे बस स्थानके, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. अशात मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सुमारे 10 जण जखमी झाले. पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी गर्दीच्या वेळी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने प्रवासी गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करत होते, त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली.
त्यानंतर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी याबाबत माहिती दिली.
ट्रेन क्रमांक 05030 वांद्रे टर्मिनस–गोरखपूर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 07.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4.15 वाजता गोरखपूरला पोहोचेल. ही ट्रेन 31 ऑक्टोबर आणि 4, 8 आणि 12 नोव्हेंबर 2024 रोजी धावेल.
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 05029 गोरखपूर-वांद्रे टर्मिनस विशेष गाडी गोरखपूरहून संध्याकाळी 7.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05.00 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन 2, 6 आणि 10 नोव्हेंबर 2024 रोजी धावेल.
थांबे- ही गाडी बोरिवली, वापी, वलसाड, उधना, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, भरतपूर, मथुरा, कासगंज, फारुखाबाद, कन्नौज, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद स्थानकावर थांबेल.
या ट्रेनमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे सर्व डबे असतील.
त्या व्यतिरिक्त गाडी क्रमांक 05022 उधना-छपरा अनारक्षित विशेष गाडी बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 रोजी उधना येथून रात्री 8 वाजता सुटेल आणि शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता छपरा येथे पोहोचेल. (हेही वाचा: Pune to Goa and Jalgaon Flight: पुणेकरांना दिलासा! FLY91 ने सुरु केली पुणे ते गोवा आणि जळगाव मार्गावर दैनिक विमान सेवा, जाणून घ्या वेळा)
ही गाडी सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, मथुरा, कासगंज, बुदौन, बरेली, पिलीभीत, मल्हाौर, लखीमपूर, सीतापूर, बुरवाल, गोंडा, बस्ती, खलीलाबाद, गोरखपूर, देवरिया सदर आणि सी स्टेशनवर थांबेल.
या ट्रेनमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे सर्व डबे असतील.