Namaz at Jama Masjid on Eid Al Adha | Photo Credits: Twitter/ ANI

मुस्लिम धर्मीयांसाठी तीन प्रमुख ईद पैकी एक असलेल्या Eid ul Adha चं आज देशभरामध्ये सेलिब्रेशन आहे. दरम्यान आज मुस्लीम बांधव कुर्बानीची ईद म्हणजे बकरी ईद (Bakrid) साजरी करत आहे. दिल्लीमध्ये जामा मशिदीत आज बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत आणि लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुरेशी काळजी घेत ही नमाज अदा करण्यात आली आहे. दरम्यान यावेळेस मुस्लीम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्लीमध्ये कोरोना संकटाची दहशत पाहता जामा मशिदीमध्ये भाविकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांचं तापमान थर्मागनच्या माध्यमातून तपासण्यात आले त्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. Happy Bakrid 2020 Wishes: बकरीद निमित्त Wishes, HD Images, Greetings, GIFs च्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करुन साजरा करा ईद-उल-अजहा चा आनंद!

 

जामा मशिद मधील दृश्य

ईदच्या शुभेच्छा

फत्तेपुरी मशिद

दिल्लीच्या जामा मशिदी प्रमाणेच फत्तेपुर मशिदीमध्येही नमाज अदा करण्यात आली होती.

तर काहींनी घरीच राहून नमाज अदा करण्याला पसंती दिली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक़वी यांनी घरीच नमाज अदा करत नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.