Eid al-Adha 2020 Marathi Wishes: मुसलमान कालगणनेतील जिलहिज्ज या बाराव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी 'बकरी ईद' साजरी केली जाते. बकरी ईदला 'ईद-उल-अजहा' असेही म्हणतात. कुर्बानीचा उत्सव म्हणून बकरी ईद सर्वत्र अगदी उत्साहात साजरी केली जाते. यंदा 1 ऑगस्ट रोजी भारतात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाचे सावट बकरी ईद या आनंदाच्या सणावर आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नातेवाईक, प्रियजनांसोबत ईदीचा आनंद घेता येणार नाही. तसंच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. परंतु, सध्याचे युग हे डिजिटल असल्याने तुम्ही सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छा देत ईदीचा आनंद लुटू शकता. त्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश, मेसेजेस, HD Images, Wallpapers, GIFs. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर हे शुभेच्छा संदेश शेअर करुन यंदाची ईद स्पेशल करा.
बकरीद चा दिवस हा फर्ज-ए-कुर्बानी चा दिवस असतो. इस्लामिक मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम यांनी आपला लहान मुलगा हजरत इस्माइल याला खुदाच्या हुकूमावरुन कुर्बान केले होते. त्याची आठवण म्हणून बकरी ईदचा सण साजरा केला जातो. तसंच या दिवशी तुमच्या आवडत्या वस्तूची कुर्बानी अल्लाहकडे द्यायची असते. म्हणून यास कुर्बानीचा सण असेही म्हणतात. (बकरी ईद निमित्त का दिली जाते कुर्बानी? जाणून घ्या Eid-ul-Adha चे महत्त्व)
बकरीद मुबारक !
हर मंजिल आप के पास आ जाये
हर दुख दर्द आपसे दूर हो जाये
इस ईद पर आप पे खुशियों की,
बौछार हो जाये
आप सभी को ईद मुबारक!
अल्लाह ताला
आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू,
हर खुशी, पुरी कराये..
बकरीद मुबारक!
ईद का त्योहार आया है
खुशिया अपने संग लाया है
खुदा ने दुनिया को महकाया है
देखो फिर से ईदा का त्योहार आया है
आप सभी को दिल से ईद मुबारक!
सूरज की किरणें, तारों की बहार, चांद की चांदनी,
अपनों का प्यार, आपका हरपल हो खुशहाल,
उसी तरह मुबारक हो आपको ईद का त्यौहार
बकरीद मुबारक!
महक उठी है फ़ज़ा
पैरहन की ख़ुशबू से
चमन दिलों का खिलाने को
ईद आई है
बकरीद मुबारक!
GIF's:
अल्लाहच्या भक्तीसाठी आपल्या प्रिय वस्तूंचा त्याग करणे ही बकरी ईदची शिकवण आहे. बकरी ईद निमित्त घरे, दुकाने, मशिदी सजवल्या जातात. नमाज पठण केले जाते. यंदा ईद निमित्त नेहमीसारखी धम्माल करता आली नाही तरी ईदीचा सण आनंदात साजरा करा. तुम्हा सर्वांना लेटेस्ली मराठीकडून बकरीद मुबारक!