राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आपल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) या महत्वाकांक्षी कार्यक्रमा अंतर्गत डिजिटली जोडलेली आरोग्य सेवा परिसंस्था तयार करण्यामध्ये आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. या अभियाना अंतर्गत, 25 कोटी पेक्षा जास्त व्यक्तींची आरोग्य-विषयक माहिती त्यांच्या आभा, (ABHA) अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्याशी जोडली गेली आहे. ABDM-सक्षम कोणत्याही आरोग्य ॲप्सचा वापर करून कोणत्याही व्यक्तीला आपल्या आरोग्याबाबतचे तपशील सहज उपलब्ध होतात आणि त्याचे व्यवस्थापन करता येते. डिजिटली उपलब्ध आरोग्य नोंदींमुळे आभा (ABHA) धारकांना एबीडीएम नेटवर्कवर उपलब्ध आरोग्य सेवा कागद-रहित माध्यमातून मिळवायला मदत होईल.
रुग्णालये, दवाखाने, रोग-निदान प्रयोगशाळा यासारख्या विविध आरोग्य सेवा केंद्रांमध्ये आपल्या आरोग्य नोंदी मिळवण्यासाठी, आणि ॲपमध्ये त्याचा संग्रह करण्यासाठी कोणतीही व्यक्ती आपल्या वैयक्तिक आरोग्य नोंदणी (PHR) ॲप्सचा वापर करू शकतील. एबीडीएम नेटवर्क द्वारे, सत्यापित आरोग्य सेवा पुरवठादारांबरोबर ते संबंधित नोंदी डिजिटली शेअर करू शकतील. यामुळे दस्तऐवज शोधण्यामधील अडचणी किंवा जुन्या नोंदी हरवण्याची चिंता दूर होईल, तसेच सुरक्षित पद्धतीने कागद-रहित माध्यमातून नोंदींची देवाणघेवाण करणे सोपे होईल. या नेटवर्कच्या मदतीने आरोग्य सेवा पुरवठादारांना रुग्णाच्या आरोग्याचा तपशीलवार इतिहास पाहण्यासाठी त्याच्या संमतीने त्यामध्ये प्रवेश मिळतो, आणि उपचारा बाबतचे अधिक चांगले निर्णय घ्यायला मदत होते.
या महत्वाच्या टप्प्याचे महत्व सांगताना एनएचए चे कार्यकारी संचालक म्हणाले- “आंतर-कार्यक्षम आणि सुलभ आरोग्य सेवा परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने भौतिक नोंदींचे डिजिटायझेशन महत्वाचे आहे. आभा (ABHA) लिंकिंगद्वारे ज्या वेगाने आरोग्य नोंदी अधिक सुलभतेने उपलब्ध केल्या जात आहेत, यामधून सर्व भागधारकांची तळमळ तसेच यामध्ये अंतर्भूत तंत्रज्ञानाची मजबूती दिसून येते. एबीडीएम चे उद्दिष्ट बहुसंख्य भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांनी साध्य होईल, ज्यामुळे त्याचा फायदा रुग्णांपर्यंत शकेल.
आभा (ABHA)-बरोबर जोडलेल्या आरोग्य नोंदींचे महत्त्व सांगताना, एनएचएचे कार्यकारी संचालक म्हणाले, “रुग्णांना आपल्या आरोग्य नोंदी तात्काळ पाहता येतात आणि त्यांना निवडक नोंदी शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. यामुळे रुग्णांना प्राथमिक तपासणीसाठी अथवा नियोजित उपचार सल्ला घेण्यासाठी आरोग्य सेवा केंद्रात प्रत्यक्ष जावे लागत नाही. केंद्रातील रुग्ण/व्यक्तींना विविध ऍप्लिकेशन्स आणि व्यासपीठांवरील माहितीची सहज देवाण-घेवाण करण्यासाठी आम्ही सक्षम करत आहोत. अशा प्रकारे आरोग्य सेवांच्या वितरणात अधिक कार्यक्षमता आणि सुलभता आणली जाईल.”
राज्य-निहाय कामगिरी आणि आरोग्य कार्यक्रमानुसार लिंकिंगचे अधिक तपशील या सार्वजनिक डॅशबोर्डवर उपलब्ध आहेत