Ayodhya Ram Mandir Guidelines for Entry Rules: मोबाईल बंदी ते रामलल्लांच्या आरतीसाठी पास पहा अयोध्येमध्ये राम मंदिरात दर्शनासाठीचे नवे नियम
Ram Mandir (PC - ANI/Twitter)

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कडून आज (13 मार्च) देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसाला सुमारे 1 ते 1.5 लाख प्रभू रामलल्लांचे अयोध्या नगरीमध्ये दर्शन घेत आहेत. भाविकांचा ओघ पाहता आता मंदिर प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये दर्शनाची वेळ, पद्धत, आरतीचे पास याबद्दल नियम नव्याने तयार करण्यात आले आहेत. 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून भाविकांसाठी मंदिर खुले झाले. पहिल्या दिवसापासूनच राम मंदिरामध्ये भाविकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे.

आता तुम्ही अयोद्धेला राम मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर काही नियमांचे भान तुम्हांला ठेवावे लागणार आहे म्हणजे तुमचं दर्शन सुकर होईल. जाणून घ्या अयोध्येमध्ये राम मंदिरात राम लल्लांचे दर्शन घेण्यासाठी असलेले नियम कोणते?

अयोध्या राम दर्शन नियमावली

  • राम लल्ल्लाच्या दर्शनाची वेळ सकाळी 6.30 ते रात्री 9.30 आहे. मंदिरात प्रवेश ते एक्झिट पर्यंतचा सारा प्रवास सोपा आहे. सध्या दर्शनाला किमान 60-70 मिनिटांचा अवधी लागत आहे.
  • भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी मंदिराबाहेर भाविकांना पादत्राणं, पर्स, मोबाईल ठेवण्यास सांगितलं जात आहे.
  • भाविकांनी रामलल्लासाठी फूलं, हार, प्रसाद आदी वस्तू आणू नये. ती चढवण्यास मनाई आहे.
  • राम लल्ल्लांच्या मंगल आरतीसाठी पहाटे 4 वाजता, शृंगार आरतीसाठी 6.15 वाजता आणि शयन आरतीसाठी रात्री 10 वाजता सोडले जाईल. मात्र त्यासाठी भाविकाकडे एन्ट्री पास असणं आवश्यक आहे. अन्य आरतींसाठी पासची गरज नाही.
  • Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust च्या वेबसाईट वरूनही आरतीचे पास उपलब्ध केले जात आहेत. हे एंट्री पास मोफत आहेत. नक्की वाचा: Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोध्या राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल? 
  • भाविकाचे नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, शहर आदींची माहिती देणं एंट्री पास साठी अनिवार्य आहे.
  • राम मंदिरामध्ये कोणत्याही स्पेशल दर्शनाची सोय करण्यात आलेली नाही. स्पेशल पास देऊन VIP दर्शन दिले जात नाही. त्यामुळे यासाठी कुणी तुमच्याकडून पैसे घेत असल्यास ती फसवणूक आहे. त्याच्याशी मंदिर प्रशासनाचा कोणताही संबंध नसेल.
  • वृद्ध मंडळी, दिव्यांग यांच्यासाठी व्हिलचेअर सुविधा आहे. ही सेवा केवळ मंदिर परिसरापुरती मर्यादित असणार आहे. शहरात अन्य ठिकाणी किंवा अन्य मंदिरामध्ये फिरता येणार नाही. व्हिलचेअर साठी भाडं नसेल पण स्वखूशीने भाविक ने-आण करणार्‍याला पैसे देऊ शकतात. Ayodhya Ram Mandir Live Aarti: राम भक्तांसाठी खुशखबर! डीडी नॅशनलवर दरोरज पाहू शकाल अयोध्या रामलल्ला मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण, जाणून घ्या वेळ .

दरम्यान अयोध्येमधील भगवान श्रीरामाचे मंदिर उभारणीसाठी मोठा संघर्ष झाला आहे. अखेर कोर्टाच्या निकालानुसार मंदिर उभं राहिलं असून अजूनही मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो.