Shankaracharya Swaroopanand Saraswati | Photo Credits: ANI

अयोद्धा राम मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपुजनाचा मुहूर्त आता 5 ऑगस्ट हा दिवस ठरला आहे. मात्र आता शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती (Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांनी अयोद्धा राम मंदिराचा भूमि पुजनाचा मुहूर्त हा अशुभ काळातील असल्याचं म्हटलं आहे. ' आम्ही देखील भगवान राम यांचे भक्त आहोत, रामाचे मंदिर कुणीही बांधावे मात्र त्याची वेळ आणि तारीख शुभ असावी अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये राजकारण नसावं. लोकांचा पैसा या मंदिर उभारणीमध्ये लागणार आहे. त्यांच्या भावनांचाही विचार व्हावा' अशी माहिती आज शंकराचार्यांनी ANI वृत्त संस्थेशी बोलताना दिली आहे.

अयोद्धेमध्ये भव्य राम मंदिर बांधले जाणार आहे. 1988 साली बनवलेल्या आराखड्यानुसार, मंदिराच्या उंचीमध्ये आता 20 फूटांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे 161 फूट उंच आणि भव्य मंदिर आता बांधले जाणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धा राम मंदिर भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार; देशभराती सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण.

ANI Tweet

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यामातून अयोद्धा राम मंदिर शिलान्यास आणि भूमि पूजनासाठी दोन तारखा समोर ठेवण्यात आल्या होत्या. 3 किंवा 5 ऑगस्ट पैकी आता 5 ऑगस्ट दिवशी हा कार्यक्रम पार पडेल अशी माहिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या या खटल्यामध्ये 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने विवादित राम जन्मभूमीचा 2.7 एकरची जागा राम लल्लाची असल्याची सांगत त्याजागी मंदिर उभारण्यास परवानगी दिली होती. तर उत्तर प्रदेशात मस्जिदीसाठी 5 एकर जागा इतर ठिकाणी देण्यास सांगितले आहे.